27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeपरभणीपकडलेल्या फरार बोगस डॉक्टरला पोलिस कोठडी

पकडलेल्या फरार बोगस डॉक्टरला पोलिस कोठडी

एकमत ऑनलाईन

जिंतूर : तालुक्यात बोगस डॉक्टरांचा मागील काही वर्षांपासून सुळसुळाट सुरू होता़ २०१४ साली तपासणी दरम्यान आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या गावात नवकुमार मंडल हा बोगस डॉक्टर आढळून आला होता.

या बोगस डॉक्टर विरोधात ३० एप्रिल २०१४ रोजीगुन्हा दाखल झाल्यापासून हा बोगस डॉक्टर फरार होता. या बोगस डॉक्टरला जिंतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपक दंतुलवार यांनी तब्बल आठ वषार्नंतर अटक केली असून यामुळे तालुक्यातील बोगस डॉक्टरांच्या वर्तुळात धडकी भरली आहे. दरम्यान बोगस डॉक्टरला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणा-या गावात बोगस डॉक्टर नवकुमार मंडल हा गोरगरीब लोकांना डॉक्टर असल्याचे भासवून औषधोपचार करीत होता़ याची माहिती बोगस डॉक्टर विरोधी पथकाला मिळाल्याने त्यांनी अचानक धाड टाकून नवकुमार मंडल विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

तेव्हापासून सदर बोगस डॉक्टर फरार होता़ दरम्यानच्या काळात शिवनी तालुका किनवट या गावात त्या डॉक्टरने आपले बस्तान बसवले व त्याही ठिकाणी बोगस डॉक्टरकीचा व्यवसाय बिनबोभाट सुरूच होता. परंतु बलात्कारासारख्या भयंकर गुन्ह्यामध्ये तो अडकला गेल्याची माहिती पोलिसांना मिळताच जिंतूर पोलिस ठाण्यात नुकतेच नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक दीपक दंतूलवार यांनी त्याला नांदेड येथील कारागृहात असताना जिंतूर पोलिसांच्या ताब्यात घेतले. दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकामार्फत ग्रामीण भागातील बोगस डॉक्टर विरोधात धडक कार्यवाही सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ़दिनेश बोराळकर यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या