26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीपाथरी तालुक्यात जुगार,मटका,गुटख्याचा महापूर

पाथरी तालुक्यात जुगार,मटका,गुटख्याचा महापूर

एकमत ऑनलाईन

परभणी : पाथरी तालुक्यात सध्या सर्वत्र जुगार अड्डे मटका व गुटख्याचा व्यवसाय पोलीसांच्या आर्शिवादाने मोठ्या प्रमाणावर फोफावल्याचे दिसून येत असून अगदी पोलीस ठाण्याच्या समोरच अनेक दुकानामध्ये खुलेआम गुटख्याची विक्री सुरु असल्याचा आरोप भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीने करण्यात आला असून दि.१० सप्टेबर २०२० पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

पाथरी शहर इतर तालुक्यातून गुटख्याची वाहने रातोरात शहरामध्ये दाखल होत .असल्याचे समजते. तसेच हा गुटखा पोलीस बंदोबस्तामध्ये आणला जातो अशीही चर्चा परिसरात सुरु आहे. एका वाहनामागे पाथरी पोलीसांना पन्नास हजार रुपये दिले जात अस्लयाचे बोलले जात आहे. अगदी पोलीस ठाण्याच्या दारासमोरच अनेक दुकानावर गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच शहरामध्ये गुटखा गोवा, राजनिवास अशा प्रकारच्या पुड्या ठोक व किरकोळ विक्री सुरु आहे. लहान शाळकरी मुले, नागरिक, गुटखा खाऊन थुंकत असल्यामुळे कॅन्सर सारखा आजार पसरत आहे.

गुटख्यासोबतच मटक्याने देखील आपले बस्तान मांडले आहे. जो गुटखा आणतो तोच मटका चालक झाल्याची चर्चा आहे. त्याने .आपले अनेक एजंटच शहरात जागोजागी नेमून चिठ्ठ्या द्वारे मटका घेणे सुरु केल्याचे दिसत आहे. हा घेतलेला मटका परळी तालुक्यात जातो असे काही मटाका लावणा-यांनी बोलून दाखवले. गुटखा, मटका चालवणा-या इसमांनीच पाथरी सेलू रोडवर शेतामध्ये जुगाराचे अड्डे देखील पोलीसांच्या आर्शिवादाने सुरु केल्याचे समजत आहे. या ठिकाणी दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे.

हा प्रकार तात्काळ थांबवावा अन्यथा येत्या १० सप्टेबर पोसून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीने विलास पाईकराव व शिवाजी शेळके हे अनेक कार्यकर्त्यासह आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

फुलपाखरांची बाग’ निर्माण करणारे उरणमधील तरूण पर्यावरणवादी कार्यकर्ते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या