25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeपरभणीकर्ज काढा पण शेतक-यांना मदत करा

कर्ज काढा पण शेतक-यांना मदत करा

एकमत ऑनलाईन

परभणी : राज्यात परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे.अशा परिस्थितीत शेतक-यांना महाविकास आघाडीच्या सरकारने वेळ प्रसंगी कर्ज काढून शेतक-यांना मदत करावी असे आवाहन विरोधीपक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवस परभणीच्या दौ-यावर आले होते. मंगळवारी गंगाखेड व सोनपेठ तालुक्याची पाहणी केल्यानंतर आज जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथील नुकसानग्र,स्त पिकांची पाहणी केली यावेळी ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री पंकजा मुंढे,माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. मेघनाताई बोर्डीकर, बाळासाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, सुनिल भोंबे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की,काळजीवाहू मुख्यमंत्री असतांना गतवर्षी अशाच प्रकारे परतीच्या पावसाने पीकांची नासाडी झाली होती. त्यावेळी १० हजार कोटी रुपयाचे पॅकेज शेतक-यांसाठी उपलब्ध करून दिले होते. व त्यानतर राज्यपालांनीही ७ हजार कोटी दिले होते. महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांना कुठलीही मदत केली नाही. यावर्षीचा खरीप हंगाम सुरु असतांनाच सुरुवातीला बोगस बियाणे व नंतर आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. जवळपास १०० टक्के नुकसान झाले असल्याने शासनाने तात्काळ शेतक-यांना मदत करावी. त्यासाठी वेळुप्रसंगी कर्जही काढावे असे आवाहन त्यांनी केले.

बांधावर मदत द्या अन्यथा फिरु देणार नाही:मुंढे
परतीच्या पावसाने शेतक-यांवर मोठे संकट ओढावले आहे असे असतांना आघाडी सरकार मधील मंत्री केवळ पोकळ घोषणा करत आहेत. प्रत्यक्षात कुणीही बांधावर आलेले नाही असे .असले तरी शेतक-यांना त्यांच्या बांधावर जावून मदत करावी अन्यथा आघाडी शासनातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा माजीमंत्री पंकजा मुंढे यांनी जिंतूर येथे दिला.

सेलू तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट शेतक-यांना कर्ज माफी देण्याच्या मागणीचे निवेदन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना सेलू तालुक्यातील शेतक-यांच्या वतीने देण्यात आले. सेलू तालुक्यात सटट पाऊस पडत .असल्यामुळे शेतक-यांचे आतोनात नुकसान झाले असून शेतातील सोयाबीन, उडीत, कापूस, मुग व तिर खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. व पुढील रबीची पेरणी करण्यासाठी मोठे संकट उभे आहे.

खरीप पेरणीसाठी शेतक-यांना खुप मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. रब्बीची पेरणीसाठी शेतक-यांना तात्काळ मदत देण्यात यावी, खरीप हंगाम पिक विमा सरसगट देण्यात यावा, तसेच शेतक-यांना कोणतीही अट न टाकता संपुर्ण शेतक-यांचे कर्ज माफ करण्यात यावे. व सेलू तालुका ओला दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीचे निवेदन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. निवेदनावर माजी सभापती रविंद्र डासाळकर, दगडोबा जोगदंड, गोविंद मगर, चंद्रकांत चौधरी, लक्ष्मण जाधव, मुशरफ खॉ पठाण, शिवादी हिंगे, आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

आमदार, खासदार शेतक-यांच्या बांधावर, प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा नवा फंडा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या