22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीशेतक-यांकडून वाळलेले सोयाबीन तहसीलदारांना भेट

शेतक-यांकडून वाळलेले सोयाबीन तहसीलदारांना भेट

एकमत ऑनलाईन

पूर्णा : पूर्णा तालूक्यातील शेत शिवारात जुलै- ऑगस्ट महिन्यात जोरदार अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे पन्नास टक्यांपेक्षाही अधिक खरीप हंगामातील सर्व पिके बाधीत होवून नेस्तनाबूत झाली. आता गेल्या बावीस दिवसांपासून पावसाने तान दिला आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर ही पिके वाळत आहेत़ पिके वाळूनही बाधीत पिकांच्या पंचनाम्याचा अहवाल गुप्तरीत्या पाठवल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याने संतप्त शेतक-यांनी वाळलेले सोयाबीन शेतक-यांना भेट देवून निवेदन दिले़

जिल्ह्यातील काही मंडळे सोडली तर अधिकाधिक मंडळात विशेष करुन पूर्णा तालूक्यातील सर्व महसूल मंडळात कोरडा दुष्काळ पसरला आहे. सोयाबीन पिके सुकून वाळून जात आहेत. तरीही कृषी व महसूल खात्यातील अधिकारी कुंभकर्ण झोपेतच असून मोजक्याच क्षेत्राची पाहणी करुन वरिष्ठ महसूल अधिका-याकडे बाधीत पिकाची माहिती पाठवण्यात आली आहे. नेमून दिलेल्या समितीतील तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांच्या टिमने प्रत्येक शिवार फिरुन न पाहता मनमानी पध्दतीने बाधित पिकाची पाहणी पंचनामा अहवाल तयार केला असून तो गुप्तरीत्या पाठवून सरकारची पाठराखण करीत शेतक-यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

त्यामुळे अतिवृष्टी आनूदानापासून उर्वरित सर्व शेतकरी वंचित राहणार आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पूर्णा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या व शेतक-यांच्या वतीने ०६ सप्टेंबर रोजी पूर्णा तहसीलदार यांना वाळलेले सोयाबीन अर्पन करण्यासाठी तहसील कचेरीवर जाऊन निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणा-या काळात भव्य गाडी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला़ या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड, तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, मंचक कु-हे, श्रीहरी इंगोले, गजानन कु-हे व तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या