22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeपरभणीकारमधून दारूसह सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

कारमधून दारूसह सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

परभणी : राणीसावरगाव येथून जवळच असलेल्या पिंपळदरी पोलिस स्टेशन अंतर्गत असणा-यापिंपळदरी ते सुपा जाणा-या रस्त्यावर काल मंगळवारी रात्री ०२.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी एका कारमधून नेण्यात येणारी अवैध दारू पकडली . या कारवाईत पोलिसांनी दारूसह, मोबाईल व कार असा ०२ लाख २७ हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केलाÞ या प्रकरणी पोलिसांनी अंबाजोगाई येथील ०३ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळदरी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शिनगारे, शिवदास धुळगुंडे,चालक पांढरे यांनी काल मंगळवार, दि.२३ ऑगस्ट रोजी रात्री ०२Þ३० वाजताच्या सुमारास पिंपळदरी ते सुपा जाणा-या रोडवर होन्डा अमेज कंपनीची एमएच २९- ६४३० या पांढ-या रंगाच्या कारचा संशय आल्याने थांबवले. कारची
तपासणी केली असता १२६७० रुपये किंमतीच्या देशी दारु भिंगरी संत्राच्या १८१ सिलबंद बाटल्या, ७६८० रूपये किंमतीच्या मॅकडाल नं.१ च्या २० बाटल्या तसेच ३२०० रूपये किंमतीच्या वेगळा बॅच नंबर असलेल्या मॅकडाल नं.१च्या बाटल्या आढळून आल्या.

तसेच एक ०४,००० रूपये किंमतीचा टेक्नो स्पार्क कंपनीचा काळया रंगाचा मोबाइल व कार असा एकुण ०२ लाख २७ हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत वामन चव्हाण, अमोल बुचडे, युवराज इंगळे तिघेही राहणार अंबेजोगाई यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या