28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeपरभणीशासकीय तंत्र प्रशाला केंद्राला पडला जयंतीचा विसर

शासकीय तंत्र प्रशाला केंद्राला पडला जयंतीचा विसर

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरातील नारायण चाळ भागात असलेल्या शासकीय तंत्र प्रशाला केंद्रातील अधिकारी, कर्मचा-यांना सोमवार, दि़२३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याच्ंया जयंतीचा विसर पडल्याचे आढळून आले़ याबद्दल जागरूक नागरीकांनी वरीष्ठांना दूरध्वनी करून विचारणा केली़ त्यानंतर संबंधीत विभागाच्या कर्मचा-यांनी सायंकाळी ६़३० वाजताच्या सुमारास जयंती साजरी करून वेळ मारून नेली़या प्रकरणी वरीष्ठांनी जयंतीचा विसर पडणा-या संबंधीत अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील नारायण चाळ भागात शासकीय तंत्र प्रशाला केंद्र आहे़ या ठिकाणी मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह वरीष्ठ व कनिष्ठ लिपीक आदी कर्मचारी कार्यरत आहेत. परंतू कार्यालयातील कर्मचा-यांना सोमवारी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्याचा विसर पडला. दिवसभरात एकाही अधिकारी व कर्मचा-याला जयंतीची आठवन न झाल्याने कर्मचारी सायंकाळी ५.१५ वाजता कार्यालय बंद करून निघून गेले़ या प्रकाराची माहिती समजताच काही नागरीकांनी मुख्याध्यापक पीक़े़अन्नपुर्णे यांना संबंधीत प्रकाराची माहिती दिली़ त्यानंतर अन्नपुर्णे यांनी पूर्णवेळ शिक्षक लवांडे यांच्याशी संपर्क साधून जयंती साजरी न केल्याच्या प्रकाराबद्दल विचारणा केली़.

त्यानंतर लवांडे, वरीष्ठ लिपीक राजकुमार टोपाजी खाडे, कनिष्ठ लिपीक श्रीकांत भोसीकर, सुरक्षा रक्षक जी़बीग़ाडगे यांनी धावपळ करीत पुन्हा कार्यालय उघडले़ त्यानंतर सायंकाळी ६़३० वाजताच्या सुमारास नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करीत झालेली चूक झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. या संदर्भात दैनिक एकमत प्रतिनिधीने मुख्याध्यापक अन्नपुर्णे यांना विचारणा केली असता त्यांनी जयंती साजरी न करणे चुकीचे आहे़ या संदर्भात संबंधित कर्मचा-यांना मेमो देवून खुलासा मागवणार असल्याचे सांगितले़ तसेच पूर्णवेळ शिक्षक लवांडे यांना विचारणा केली असता त्यांनी आम्ही पेपर तपासणीच्या कामात व्यस्त असल्याने आम्हाला जयंती साजरी करण्याचे लक्षात राहीले नाही असे सांगितले.

जयंतीसाठी फोटोच नसल्याने उडाली भंबेरी
जयंती कार्यक्रमासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो होता़ परंतू हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो उपलब्ध नव्हता़ त्यामुळे कर्मचा-यांची चांगलीच पंचायत झाली़ यातुन मार्ग काढण्यासाठी काही कर्मचा-यांनी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बाळासाहेबांच्या छायाचित्राची कलर प्रिंट काढून ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जुन्या फोटोच्या मागे चिटकवली़ त्यानंतर जयंती कार्यक्रम साजरा करून कर्मचा-यांनी वेळ मारून नेली.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या