24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeपरभणीओबीसी समाज बांधवांचा आरक्षणासाठी महामोर्चा

ओबीसी समाज बांधवांचा आरक्षणासाठी महामोर्चा

एकमत ऑनलाईन

परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसींच्या आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी सोमवार, दि. १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल ओबीसी समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे ओबीसी समाजबांधवांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा कायम सुरु ठेवणार असल्याचा निर्धार ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी व्यक्त केला. शहरातील शनिवार बाजार येथून निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते.

ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाभरातून वाहनांद्वारे वाजत-गाजत झेंडे फडकवित हजारो कार्यकर्ते सोमवारी सकाळ पासून शनिवार बाजारात दाखल झाले होते़ जिल्हाभरातून आंदोलनकर्ते एकत्र आल्यानंतर या मोर्चास प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा देवी चौक, नारायण चाळ कॉर्नर मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील मैदानावर पोहचला़ या वेळी आंदोलकांनी झेंडे, बॅनर फडकवून जोरदार घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय ठरली़ तर विविध पारंपारिक वेशभूषेतील महिला, कलावंत तसेच पारंपारिक वादकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी एका शिष्ट मंडळाने जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले. या निवेदनातून ओबीसी आरक्षण कायम ठेवा. ओबींसींची जातनिहाय जनगणना करा. ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत निवडणूका पुढे ढकला़ मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणूका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना देखील ओबीसी आरक्षणासंदर्भात काही ठोस निर्णय होऊ शकला नाही. यापुर्वी झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत ४६५ ओबीसींच्या जागेला ओबीसी मुकलो आहोत. ओबीसी समाजाचे सभागृहात प्रतिनिधी नसणे हे घटनेचे अवमुल्यन आहे़ शिवाय ओबीसी समाजाचे पुन्हा न भरून निघणारे नुकसान देखील आहे, अशी खंत शिष्टमंडळाने निवेदनातून व्यक्त केली.

या मोर्चात माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, नानासाहेब राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार बुरांडे, रामराव वडकुते, कॉ.राजन क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण कार्याध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, रामप्रभू मुंडे, विठ्ठलराव रबदडे, संतोष मुरकुटे, श्रीनिवासजी मुंडे, काँग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव, अविनाश काळे, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, सौ.शकुंतला मुंडे, राजेंद्र वडकर, माजी महापौर संगीता वडकर, मुंजाजी गोरे, लक्ष्मण बुधवंत, ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके, विशाल बुधवंत, गंगाप्रसाद आनेराव, शिवलिंग आप्पा खाकरे, सचिन अंबिलवादे सौ. नंदा राठोड, अनंत बनसोडे, चंद्रकांत बोकन, सिद्धेश्‍वर गिरी, प्रदीप फाले, एकनाथ काळे, केशवराव बुधवंत, मुरलीधर मते, रमेश गीते, सुरेश भुमरे, गोपाळ गोरे, संपत सवणे, भवरे, प्रभाकर जयस्वाल, सचिन रासवे, अरुणा काळे, सौ. साधना राठोड, सौ.अश्विनी घोगरे, विश्‍वनाथ थोरे, अशोक भोसले, हनुमंत डाके, पंडितराव रासवे, अ‍ॅड. संजय केकान, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.धर्मराज चव्हाण, कृष्णा कटारे, राजेश बालटकर, शुभम जाधव, सुमित परिहार आदी सहभागी झाले होते़ यावेळी जिल्हाध्यक्ष बुरांडे यांनी प्रास्ताविकातून मोर्चामागील भूमिका सांगितले़ यावेळी अ‍ॅड.परिहार, नानासाहेब राऊत, विशाल बुधवंत, किरण सोनटक्के, रामप्रभू मुंडे, गंगाप्रसाद आनेराव, राजाभाऊ फड, अरुण काळे, अ‍ॅड.धर्मराज चव्हाण, मोईन मौली, विठ्ठलराव रबदडे, सौ.नंदा राठोड, सौ.साधना राठोड यांची भाषणे झाली. माजी उपमहापौर वाघमारे यांनी अध्यक्षीय समारोपातून निर्णायक लढाईचा इशारा दिला. आभार बालटकर यांनी मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या