परभणी : सत्तेशी संघर्ष करायला शिकविणारे, तळागाळातील सामान्यांसाठी लढा उभारणारे लोकनेते स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणी भाजप महानगर कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके, राजेश देशपांडे, जिल्हा युवा मोर्चा प्रभारी दत्ता चेवले, सरचिटणीस दिनेश नरवाडकर, उपाध्यक्ष मधुकर गव्हाणे, विजय गायकवाड, प्रशांत सांगळे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश शेळके, वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. मनोज पोरवाल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, दिव्यांग आघाडी संयोजक रावसाहेब धरणे, विठ्ठल बोबडे, अनिल बडगुजर, आत्मनिर्भर योजना संयोजक गणेश देशमुख, युवा मोर्चा उपाध्यक्ष अजिंक्य औंढेकर, वैभव शिंदे, नरेंद्र सबनीस, मंडळाध्यक्ष नीरज बुचाले, युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख माऊली कोपरे, व्यापारी आघाडी प्रमुख प्रसाद रोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.