26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeपरभणीस्कॉर्पीओमधून जाणारा गुटखा पकडला

स्कॉर्पीओमधून जाणारा गुटखा पकडला

एकमत ऑनलाईन

पूर्णा : स्कॉर्पीओ जीपमधून अवैधरित्या विक्रीस जाणारा गुटख्याचा साठा स्थानिक पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत स्कॉर्पीओ जीपसह गुटख्याच्या साठा असा ५ लाख ७४ हजार ०४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात जीप चालक व गुटखा तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार शहरातील विजयनगर कॉर्नरवर सपोनि.दिनेश मुळे, पोउपनि.महेंद्र पोपलवार, बिट जमादार नितिन वडकर, हजरी मेजर समीर अख्तर पठाण या पथकांनी स्कॉर्पीओ जीप क्र.एम एच २३ एडी ३७७६ ला रोखुन जीपची झडती घेतली असता जीपच्या मागील सीट खाली तीन पोत्यात अवैध गुटख्याचा साठा सापडला.

दोन पंचासमक्ष पंचनामा करून तीन पोते गुटखा आणि स्कॉर्पीओ जीप मिळून ५ लाख ७४ हजार ०४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून जीप चालक नागेश भिसे (राख़ूजडा) यास ताब्यात घेऊन गुटख्या बद्दल विचारले असता त्यांनी पूर्णा येथील माणिक कदम यांचा असल्याचे सांगितले. या प्रकरणी बिट जमादार नितीन वडकर यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून माणिक कदम, जीप चालक नागेश भिसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अवैध गुटखा प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे करीत आहेत.

ऑगस्ट अखेर देशात तिसरी लाट?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या