23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeपरभणीकन्हैयालाल हत्येतील आतंकवाद्यांना फाशी द्या

कन्हैयालाल हत्येतील आतंकवाद्यांना फाशी द्या

एकमत ऑनलाईन

परभणी : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने कन्हैयालाल हत्ये विरोधात शुक्रवार, दि़. १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. इस्लामिक जिहादी जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी तरुणांच्या क्रूरपणे हत्या घडवत आहेत़ दंगली घडवून हिंदु समाजाला टार्गेट करत आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करून पोलिसांवर हल्ले करत आहेत. या हत्येतील आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत उपाध्यक्ष अनंत पांडे, बजरंग दल देवगिरी प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे, जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र शहाने, कार्याध्यक्ष प्रल्हादराव कानडे, जिल्हा मंत्री सुनील रामपूरकर, जिल्हा सहमंत्री राजकुमार भांबरे, शहर अध्यक्ष मनोज काबरा, शहर संयोजक संदीप यलगंदवार, दिवाळकर, अभिजीत कुलकर्णी, गोपाळ रोडे, गणेश काळबांडे, श्रीपाद कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थीत होते. यावेळी उपाध्यक्ष श्री़अनंत पांडे यांनी जिहादी मानसिकता खपवून घेतली जाणार नाही.

हिंदुधर्माच्या विरोधात कृती आम्ही खपवून घेणार नाही असे सांगितले. तसेच पोलिसांनी सतर्क राहून अशा जिहादी मानसिकता ठेचून काढाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले़ बजरंग दल प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच बजरंग दलाचा जन्म झाला आहे. बजरंग दल अशा घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो व आतंकवाद्यांना त्वरित फासावर चढवावे. तसेच जिहादी शोधून काढून त्यांना त्वरित जेलमध्ये टाकावे अशी मागणी करण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जिल्हा सहकार्यवाह अभिजित आष्टुरकर यांनी मार्गदर्शन केले़ भाजपाचे संजयराव शेळके, मोहनराव कुलकर्णी, सौ़सुनीताताई कुलकर्णी, प्रशांत पार्डिकर, राजु शिरडकर, अभाविपचे अद्वैत पार्डीकर, सुरज पानसे, सुत्रसंचालन जिल्हा मंत्री सुनील रामपूरकर यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या