सोनपेठ: तालुक्यातील ४२ पैकी मुदत संपलेल्या ३९ ग्रामपंचायतीवर प्रशासक कारभार पाहत होते. मात्र कोरोना काळाच्या पार्श्वभुमीवर नेमण्यात आलेल्या शासकीय प्रशासकांकडून ग्रामीण भागातील प्रश्नाची सोडवणूक होत नसल्याच्या शासन दरबारी निदर्शनास आले होते. याबाबतची बैठक संपन्न होवून सरपंच पदाचे आरक्षण सोडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. तेंव्हापासून गावपातळीवरील इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली असून सोनपेठमध्ये नुकत्याच ४२ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी इच्छुकांनी तहसील परिसरात मोठी गर्दी केली होती. यात सरपंचपदाची आरक्षण सोडत आज गुरूवारी काढण्यात आली. या सोडतीत ४२ पैकी २२ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण महिलांसाठी सुटल्याने ग्रामपचंयातीवर येणा-या काळात महिलाराज येणार असल्याचे आरक्षण सोडतीतून स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील सोनपेठ तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण १९ नोव्हेंबरला तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले. १)वाणीसंगम सर्वसाधारण महीला, २) पोहंडुळ सर्वसाधारण, ३) दुधगाव सर्वसाधारण महीला, ४) गवळी पिंपरी नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बि.सी.), ५) उक्कडगाव मक्ता सर्वसाधारण महीला, ६) थडी उक्कडगाव नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला), ७) गंगापिंपरी सर्वसाधारण महीला, ८) मोहळा सर्वसाधारण महीला, ९) करम सर्वसाधारण, १०) वंदन नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला), ११) आवलगाव नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बि.सी.), १२) धामोणी सर्वसाधारण, १३) चुकारपिंपरी सर्वसाधारण महीला, १४) उखळी सर्वसाधारण, १५) वाडीपिंपळगाव सर्वसाधारण महीला, १६) डिघोळ ई.नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला), १७) नैकोटा सर्वसाधारण महीला, १८) लासीना नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बि.सी.), १९) शिर्शी बू.सर्वसाधारण, २०) वडगाव नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला), २१) खपाट पिंपरी सर्वसाधारण महीला, २२) शिरोरी नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला), २३) निळा सर्वसाधारण महीला, २४) वैतागवाडी सर्वसाधारण, २५) सायखेडा सर्वसाधारण, २६) विटा खु. सर्वसाधारण, २७) कोरटेक सर्वसाधारण, २८) कान्हेगाव सर्वसाधारण, २९) नरवाडी आनुसुचीत जाती महीला, ३०) खडका आनुसुचीत जाती, ३१) थडीपिंपळगाव आनुसुचीत जाती, ३२) धार डिघोळ आनुसुचीत जाती, ३३) शेळगाव अनुसुचीत जाती महीला, ३४) बोंदरगाव सर्वसाधारण, ३५) तिवठाना आनुसुचीत जाती महीला, ३६) भिसेगाव नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (ओ.बि.सी.महीला), ३७) लोहीग्राम सर्वसाधारण महीला, ३८) निमगाव सर्वसाधारण महीला, ३९) कोठाळा सर्वसाधारण, ४०) पारधवाडी सर्वसाधारण महीला, ४१) बुक्तरवाडी सर्वसाधारण महीला, ४२) देवीनगर तांडा नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बि.सी.), या सुटलेल्या आरक्षणातून काहींच्या डोळ्यावर आनंदाचे क्षण तिरळत होते. तर काही इच्छुकांच्या आशेवर आरक्षण बदलीमुळे नाराजी दिसून येत होती. मात्र या आरक्षणाची चर्चा सोनपेठमध्ये ठिकठिकाणी होत असल्याचेही दिसून आले. यावेळी तहसील प्रशासनाच्यावतीने आरक्षणाच्या सोडतीचे काटेकोर पालन करण्यात आल्याचे दिसून आले. यात तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्यासह कर्मचा-यांनी परीश्रम घेतले.
पालम: सोडतीनंतर कही खुशी कही गम
पालम: तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. यामध्ये ६६ पैकी ३७ ग्रामपंचायतीवर सर्वसाधारण, १७ ग्रामपंचायत ओबीसी, ९ अनुसूचित जाती, ३ अनुसूचित जमाती उमेदवारांची सरपंच म्हणून ग्रामपंचायतवर विराजमान होणार आहे. या सोडतीनंतर गुडघ्याला बाशिंग बांधलेले इच्छुक उमेदवार आरक्षण सोडतीनंतर कामाला लागले आहे. तर अनेक इच्छुकांच्या पदरी आरक्षणानंतर निराशा पदरी पडल्याने हिरमोड झाल्याचे दिसून आले.
फळा- अनु.जाती, गुळखंड- अनु.जाती महिला, बोरगाव बु.- अनु.जाती, रावराजुर- अनु.जाती महिला, फरकंडा- अनु.जाती महिला, पेठशिवणी- अनु.जाती, उक्कडगाव- अनु.जाती, खुलेर्वाडी- अनु.जाती महिला, पेंडू खु- अनु.जाती, पेठपिंपळगाव- अनु.जमाती महिला, कोळवाडी- अनु.जमाती महिला, वनभुजवाडी- अनु. जमाती, धनेवाडी- नामाप्र, पारवा- नामाप्र महिला, रहाटी- नामाप्र महिला, खोरस- नामाप्र महिला, वाडी खु./वाडी बु.- नामाप्र महिला, बोरगाव खु.- नामाप्र महिला, मोजमाबाद- नामाप्र महिला, कापसी-नामाप्र महिला, तांदूळवाडी- नामाप्र महिला, रोकडेवाडी- नामाप्र, भालकुंडकी- नामाप्र, सिरसम- नामाप्र, तांदुळगाव-नामाप्र, पोरवड- नामाप्र, ल्लाडकवाडी- नामाप्र, डिग्रस- नामाप्र, घोडा/सोमेश्वर- नामाप्र, वरखेड- नामाप्र महिला. आडगाव-सर्वसाधारण, बदरवाडी- सर्वसाधारण महिला, दुटका- सर्वसाधारण, मार्तंडवाडी- सर्वसाधारण महिला, पिंपळगाव मु.-सर्वसाधारण, तेलजापुर- सर्वसाधारण, उमरा-सर्वसाधारण महिला, जवळपा पा.-सर्वसाधारण महिला, गुंज- सर्वसाधारण, शेखराजुर- सर्वसाधारण, सिरपुर- सर्वसाधारण, पोखर्णी देवी- सर्वसाधारण महिला, आजमाबाद- सर्वसाधारण महिला, गिरीधरवाडी- सर्वसाधारण महिला, सेलू-सर्वसाधारण महिला, डोगरगाव- सर्वसाधारण महिला, सादलापुर-सर्वसाधारण, बनवस- सर्वसाधारण, आरखेड- सर्वसाधारण, नाव्हा- सर्वसाधारण महिला, नाव्हलगाव- सर्वसाधारण, सादगीरवाडी- सर्वसाधारण महिला, कोन्हेरवाडी- सर्वसाधारण, पेंडू बु.- सर्वसाधारण महिला, सातेगाव- सर्वसाधारण महिला, खरबधानोरा- सर्वसाधारण, फत्तुनाईकतांडा-सर्वसाधारण महिला, आनंदवाडी- सर्वसाधारण महिला, खडी- सर्वसाधारण, पुयणी- सर्वसाधारण, चाटोरी- सर्वसाधारण महिला, सायाळा पा.-सर्वसाधारण, उमरथडी-सर्वसाधारण, महादेववाडी- सर्वसाधारण महिला, रामापुर- सर्वसाधारण अशी आरक्षण सोडत जाहीर झाली आह.े
पाथरी: ४९ सरपंचाचे आरक्षण जाहीर
पाथरी:- तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. ही सोडत म. फुले मंगल कार्यालयात पार पडली. आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
पाथरी तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडतीत वडी-अ.जाती, जैतापुर वाडी/ समर्थ नगर-अ.जाती, रेणापुर-अ.जाती, रेणाखळी- अ.जाती, चाटे पिंपळगाव-अ.जाती महिला, फुलारवाडी- अ.जाती महिला, जवळा झुटा-अ.जाती महिला, रामपुरी खु.- अ.जाती महिला, सारोळी बु.- नामाप्र., सिमुरगव्हाण- नामाप्र, बांदरवाडा- नामाप्र, अंधापुरी-नामाप्र, ढालेगाव-नामाप्र, मसला खु./मसला तांडा-नामाप्र, मरडसगाव/श्रीरामपुरवस्ती-नामाप्र महिला, निवळी- नामाप्र महिला, डाकुपिंपरी/ तारूगव्हाण- नामाप्र महिला, आनंदनगर-नामाप्र महिला, लोणी बु.-नामाप्र महिला, डोंगरगाव-नामाप्र महिला, पाथरगव्हाण खु. नामाप्र महिला, खेर्डा/ सारोळी खु.-सर्वसाधारण, पाटोदा ग.कि.- सर्वसाधारण, मुदगल-सर्वसाधारण, कासापुरी-सर्वसाधारण, देवेगाव – सर्वसाधारण, वाघाळा-सर्वसाधारण, नाथरा-सर्वसाधारण, देवनांद्रा- सर्वसाधारण, टाकळगव्हाण/ टाकळगव्हाण तांडा-सर्वसाधारण, वरखेड/ किन्होळा- सर्वसाधारण, बानेगाव-सर्वसाधारण, गोपेगाव-सर्वसाधारण, उमरा- सर्वसाधारण, पाथरगव्हाण बु.- सर्वसाधारण, लिंबा/ लिंबा तांडा-सर्वसाधारण महिला, बोरगव्हाण-सर्वसाधारण महिला, मंजरथ- सर्वसाधारण महिला, पोहेटाकळी- सर्वसाधारण महिला, गौंडगाव-सर्वसाधारण महिला, बाबुलतार-सर्वसाधारण महिला, खेडूळा- सर्वसाधारण महिला, झरी-सर्वसाधारण महिला, गुंज खु.- सर्वसाधारण महिला, बाभळगाव-सर्वसाधारण महिला, हादगाव बु.-सर्वसाधारण महिला, तुरा- सर्वसाधारण महिला, कानसुर/तांडा- सर्वसाधारण महिला, विटा बु.-सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. दरम्यान आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही पुढा-यांच्या चेह-यावर हसू तर काहींच्या चेहरे पडले होते.
गंगाखेड: ग्रामपंचायती चुरस वाढणार
गंगाखेड:- तालुक्यातील ८४ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. या सोडतीनंतर इच्छुकांमधून समाधान व्यक्त झाले.
गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या इच्छुकांमधुन समाधान व्यक्त होत होत. तर काही इच्छुकांच्या अपेक्षा मात्र पुर्ण होवू शकल्या नाहीत. आज जाहीर झालेले आरक्षण गाव निहाय पुढील प्रमाणे. अनु.जाती- सुरळवाडी, धारासुर, चिलगरवाडी, तांदूवाडी, बैलवाडी, उंबरवाडी. अनु.जाती महिला- सुप्पा, खोकलेवाडी, सायाळा सु., डोंगरगाव, वाघदरा, वरवटी, अनु.जमाती – हरगुंळ, अनु.जमाती महिला – घंटाग्रा, नागरिकांचा मागासप्रवर्ग- मरगळवाडी, डोंगरपिंपळा, माखणी, मालेवाडी, धनगर मोहा, बनपिंपळा, शेंडगा, पांगरी, शंकरवाडी, अंतरवेली, गोदावरी तांडा, लिंबेवाडी, नागरिकांचा प्रवर्ग महिला – पडेगाव, ढग्याची वाडी, नरळद, खंडाळी, सेलमोहा, इळेगाव, पांढरगाव, टोकवाडी, देवकतवाडी, बोथी, गौंडगाव, सर्वसाधारण – आरबुजवाडी, भेंडेवाडी, भांबरवाडी, अकोली, चिंचटाकळी, दगडवाडी, डोंगरजवळा, खळी, कौडगाव, नागठाणा, निळा नाईक तांडा, पिंपळदरी, पोखर्णी वा., रूमना ज, उंडेगाव, उखळी खु., वाघलगाव, इरळद, कातकरवाडी, कासारवाडी, गुंजेगाव, वाघदरी, बोर्डा, सर्वसाधारण महिला -आनंदवाडी, दामपुरी, धारखेड, ढवळकेवाडी, इसाद, गोपा, जवळा, खादगाव, मुळी, महातपुरी, मरडसगाव, मसला, मानकादेवी, मसनेरवाडी, पिंप्री झोला, राणीसावरगाव, सिरसम, झोला, मैराळ सावंगी, वडवणी, सांगळेवाडी, दुसलगाव, लोदी, गौळवाडी आदी गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे आरक्षण आज जोडतीद्वारे जाहीर करण्यात आले.
कंपन्यांच्या सीएसआरमधून कर्मचा-यांचे लसीकरण करु द्या : किरण शॉ