24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीसिमेंट गट्टूचे घाव घालून केली पत्नीची हत्या

सिमेंट गट्टूचे घाव घालून केली पत्नीची हत्या

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरातील महात्मा गांधी नगरमध्ये प्लॉट विकण्यास विरोध करणा-या पत्नीला पतीने गट्टूचे घाव घालून गंभीर जखमी केल्याची घटना काल बुधवारी घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा गुरूवार, दि. १८ ऑगस्ट रोजी उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गांधी नगरमध्ये शेषेराव रामराव प्रधान वास्तव्यास आहेत. त्यांचे पत्नी मंगल प्रधान यांच्यासोबत बुधवार, दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास भांडण झाले. प्रधान यांनी मागील केसमध्ये पोटगीचे वारंट असून त्या महिलेस पैसे द्यायचे आहेत. म्हणून मंगल यांना सेवकनगर मधील प्लॉट विक्री करून पैसे देऊ असे म्हणाले होते. परंतू आई मंगल हिने प्लॉट विक्रीस विरोध केल्याने वडील प्रधान यांनी गट्टूने मारहाण केल्याची माहिती मुलगा नितीन प्रधान याने मंगल यांचे भाऊ चेतन लाटे यांना दिली होती.

त्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चेतन लाटे यांनी परभणीत येऊन नितीन यास भांडणाचे कारण विचारले असता त्याने वरील माहिती सांगितली. दरम्यान घटनेत गंभीर जखमी झालेल्या मंगल यांना नातेवाईकांच्या मदतीने जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असल्याने मंगल यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले.

औरंगाबादकडे जात असताना बोरगाव येथे पोहचले असता अती रक्तस्त्राव होत असल्याने मंगल यांना पुन्हा परभणी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. परंतू गंभीर जखमी झालेल्या मंगल यांचा गुरूवारी सकाळी ११Þ३० च्या सुमारास उपचार दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी पती शेषराव प्रधान याच्याविरूध्द नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी, पोलिस हवालदार कांबळे, पोशिकल्याण नागरगोजे करीत आहेत. या प्रकरणी आरोपी पती शेषराव प्रधान फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखा, नानलपेठ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या