पुर्णा : तालुक्यातील आहेरवाडी येथे सुरू असलेल्या सजगिर महाराज व हिरागिर महाराज यात्रेनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात ५०० पेक्षा जास्त लोकांनी आरोग्य तपासणी करीत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
आहेरवाडी येथे तिर्थक्षेत्र सजगिर महाराज व हिरागिर महाराज यांच्या यात्रेनिमित्त नांदेड येथिल डॉ.राजेंद्र पाटील, डॉ.बालाजी जाधव, डॉ.गणेश कदम, डॉ.देवानंद पवार, डॉ.अविनाश भारती, डॉ.बालचंद्र थोरात, डॉ.आकांक्षा चव्हाण, डॉ.अनुजा कल्याणकर, डॉ.विजया मुंडेवार, डॉ.हेमंत मिरचे व आहेरवाडी येथिल डॉ.विशाल मोरे यांनी यात्रेत आलेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी केली. कृष्णा मोहिते, ओमकार मोरे, मुन्ना खंदारे, किरण मोरे, बालाजी मोरे यांच्यासह नवयुवकांच्या वतिने रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.