20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeपरभणीआरोग्य सेवेत कसूर करणा-यांची गय केली जाणार नाही : जिल्हाधिकारी गोयल

आरोग्य सेवेत कसूर करणा-यांची गय केली जाणार नाही : जिल्हाधिकारी गोयल

एकमत ऑनलाईन

पालम : येथील ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यासह कर्मचारी कामकाजात कसूर करून रूग्णांना योग्य उपचार व सेवा उपलब्ध करून देत नसतील तर त्यांची कसल्याही प्रकारे गय केली जाणार नाही अशा सुचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या आहेतÞ जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवार, दिÞ२३ नोव्हेंबर रोजी पालम ग्रामिण रूग्णालयास भेट देवून पाहणी केलीÞ यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी रूग्णालयातील विभागाची पाहणी करून उपस्थित डॉक्टरांशी चर्चा केलीÞ यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या की, पालम शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश रुग्णांचा उपचारासाठी भर हा पालम शहरातील ग्रामीण रुग्णालयावर असल्याने या ठिकाणाहून प्रत्येक रूग्णाला योग्य सोयीसुविधा युक्त उपचार उपलब्ध व्हावेतÞ रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना योग्य उपचार व सेवा देण्यास अधिकारी व कर्मचा-यांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी वरिष्ठांना कळवाव्यातÞ त्या सर्व अडचणींवर मार्ग काढून सर्व जनतेला योग्य ती सेवा पुरवण्याचा प्रयत्न करू तसेच या ठिकाणी कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचा-यांनी जनतेशी सुसंवाद साधत जनतेच्या मनामध्ये शासकीय रुग्णालयाच्या बाबतीत आपुलकीची भावना निर्माण करावी व विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक मिळवावाÞ तसेच जनतेने सुध्दा रूग्णालयात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांवर विश्वास ठेवून त्यांना सहकार्य करत आरोग्य विषयक सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केलेÞ

दरम्यान जिल्हाधिका-यांनी पालम येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी अचानक भेट देणे गरजेचे होतेÞ परंतू नियोजीत दौरा असल्याने शंभर टक्के कर्मचारी उपस्थित होतेÞ त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी अचानक दौरा करावा अशी मागणी नागरिकातुन होत आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी राहूल गित्ते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार प्रतिभा गोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉÞदिनेश बडे, नगरपंचायत पालमचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, डॉÞप्रणील हिरक, डॉÞसंदीप भस्के, डॉÞकिरण आंबटवार, जोगेंद्र खंडेरे, भूषण कोंडेकर, संदीप मुरकुटे, महेश दुबे आदी कर्मचारी उपस्थित होतेÞ

डॉक्टरांसाठी निवासस्थाने बांधण्याची मागणी
पालम ग्रामीण रुग्णालय येथे आसपासच्या ८२ गावातून रूग्ण येतातÞ परंतू येथे रात्रीच्या वेळी डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने रूग्णांची गैरसोय होतेÞ यासाठी जिल्हाधिकारी यांनि लक्ष देणे गरजेचे असून या ठिकाणी निवासस्थाने बांधून देण्यात यावीत असा मुद्दा पत्रकार संघाने उपस्थित केलाÞ यावेळी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष देणार असल्याचे सांगितलेÞ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या