22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeपरभणीमुसळधार पावसाने सखल भागातील घरात शिरले पाणी

मुसळधार पावसाने सखल भागातील घरात शिरले पाणी

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सुनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी मध्यरात्री परभणी शहरासह परीसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिंगळगढ नाल्याला पूर आला होता. त्यामुळे पुलावरून जाणारी वाहतूक सोमवार सकाळ पासून ठप्प झाली होती. तसेच चिद्रवार नगरमध्ये घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

गेल्या दोन- चार दिवसांपासून जिल्ह्यात सलग पाऊस होत आहे. शनिवारी रात्री सव्वा दोन वाजेपासून तब्बल सव्वा ते दीड तास जोरदार पाऊस सुरु होता. या पावसाने सखल भागातील वसाहतीत मोठी दाणादाण उडवली. घराघरांमधून पाणी शिरले. रविवारी दुपारपर्यंत ते पाणी हटवितांना सर्वसामान्य नागरीकांना मोठ्या कसरती कराव्या लागल्या. त्यातच रविवारी रात्री पावसाने पुन्हा सलामी दिली. रात्री सोसाट्याच्या वा-यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला.

त्यामुळे सखल भागातील वस्त्यांमधून घराघरात पाणी शिरले. रस्ते जलमय झाले. नाल्यांचे पाणी रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहू लागले होते. जूना पेडगाव रस्त्यावरील चिद्रवार नगरात काही घरांमधून पाणी घुसल्यानंतर नागरीकांची मोठी तारांबळ उडाली. तसेच पिंगळगढ नाल्याला देखील पुर आल्याने या पुलावरून जाणारी वाहतूक सोमवारी सकाळ पासून ठप्प पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.

स्पुटनिक व्ही बाजारात दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या