24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले असून शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे. परभणी जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच पावसानंतर शेतक-यांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पेरणीची लगबग आटोपताच पावसाने दडी मारली. यामुळे पेरणी केलेली पिके पाण्या अभावी माना टाकतांना दिसत होत्या. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असतांना गुरूवारी रात्री पावसाने जोरदार आगमन केले. तसेच शुक्रवारी दुपारी परत मुसळधार पाऊस झाल्याने शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे. हा पाऊस पिकांसाठी जीवदान देणारा ठरला आहे.

पूर्णा : पूर्णा शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून तब्बल 20 दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. पूर्णा तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मोसमी पावसाने तालुक्यामध्ये हजेरी लावली होती. सर्वप्रथम पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील शेतक-यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकाची लागवड व पेरणी मोठ्या प्रमाणात केली होती. लागवड केल्यानंतर पाच ते सहा दिवसांमध्ये संपूर्ण पिकाची उगवण शक्ती झाली. परंतु त्यानंतर अधून-मधून पडणारा पाऊस तालुक्यातील काही भागांमध्ये पडला व काही भागांमध्ये उघडीप दिली तर तब्बल 20 ते 25 जून पासून तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडला नव्हता त्यामुळे ताडकळस, चुडावा, एरंडेश्वर, कातनेश्वर, कावलगाव या भागातील सोयाबीन, कापूस ही पिके सुकू लागली होती.

यामूळे शेतकरी वर्ग चितेत पडले होते. परंतु ७ जुलै रोजी सायंकाळी चार ते साडेचार च्या दरम्यानह्यालुक्यातील कावलगाव परिसरामध्ये हलक्‍या पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर रात्री तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पाऊस पडला हा पडलेला पाऊस कापूस, मूग, उडीद या पिकांसाठी मोठा लाभदायक ठरला असून शुक्रवारी दिवसभर शेतक-यांनी शेतातील अंतर्गत मशागतीच्या कामांना सुरूवात केली. दरम्यान या पावसामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे.

लोकसंख्या वाढली; लोककल्याणाचे काय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या