24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeपरभणीशेतक-यांना मदत मिळवून देणार

शेतक-यांना मदत मिळवून देणार

एकमत ऑनलाईन

परभणी : मागील दोन महिन्यापासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामूळे बाधित झालेल्या शेतक-यांचे तातडीने पंचनामे पूर्ण करुन मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. सुरेश वरपुडकर, आ.डॉ. राहूल पाटील, आ.रत्नाकर गुट्टे, आ.श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.,पोलीस अधीक्षक जयंत मीना, महापालिका आयुक्त देविदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना पालकमंत्री मलिक म्हणाले की, हवामान खात्याने पुन्हा पाऊस होणार असल्याचे संकेत दिले असून अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेऊन मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास २ लाख १५ हजार ६७५ शेतकरी असून बाधित क्षेत्र १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टर आहे. या बाधित शेतक-यांना नियमाप्रमाणे १०८ कोटी १५ लक्ष रुपये नुकसान भरपाई अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील बँकांनी प्रथम येणा-यास पीक कजार्चे वितरण या नियमाप्रमाणे पीक कर्ज वाटप करावे. तसेच एखाद्या बँकेकडे गाव दत्तक नसल्यामुळे पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात बँकांनी किसान क्रेडीट कार्डची व्याप्ती वाढवावी, असे निर्देशही संबंधित अधिका-यांना देवून रब्बीच्या पेरणीबाबत बियाण्यांची गरज व पुरवठा याबाबतची माहिती विचारात घेवून रब्बीला लागणा-या सर्व बियाण्याचे नियोजन करण्याच्या सुचना यावेळी पालकमंत्री मलिक यांनी दिल्या.

जिल्ह्यात महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून कोव्हिड-१९ संसर्ग झालेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल केल्यास मोफत उपचार करणे या योजनेने बंधनकारक आहे.

निसर्गाने तर अन्याय केलाच आता राज्‍य सरकारही सूड घेतेय ! – देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या