30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home परभणी परभणीत भाजपकडून वीज बिलांची होळी

परभणीत भाजपकडून वीज बिलांची होळी

एकमत ऑनलाईन

परभणी : वीज बिलांची दरवाढ रद्द करावी, लॉकडाऊन काळातील सरासरी बिले रद्द करावीत या मागणीसाठी जिंतूर रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.23) वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी श्री.दरेकर यांनी सरकारने वीज बिलांचा प्रश्न जाणीवपूर्वक सोडवाला नसल्याचा आरोप केला.

लॉकडाऊनच्या काळात अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली आहेत अनेकांना ही बिले भरणे देखी शक्य नाही. या विरोधात भाजपने आज केलेल्या आंदोलनात आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे, अभय चाटे, सुरेश भुमरे, दिनेश नरवाडकर, व्यंकटराव तांदळे, समीर दुधगावकर, राजेश देशपांडे, गणेश काजळे पाटील, शशिकांत देशपांडे, बाळासाहेब भालेराव, रामदास पवार, अनंता गिरी, आकाश लोहट, शिवाजी शेळके यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला.

यावेळी श्री.दरेकर म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस सरकाला हा प्रश्न सोडवायचा असता तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांची बेठक घेवून हा प्रश्न १० मिनीटात सोडवता आला असता. परंतू सरकारला हा प्रश्न सोडवायचा नसल्याचा आरोप श्री.दरेकर यांनी यावेळी केला. लॉकडाऊन बाबत महाराष्ट्र सरकारमधील तीन्ही पक्षाच्या नेत्यांकडून येत असलेल्या वेगवेगळ्या विधानामुळे नागरिकात संभ्रमावस्था वाढत असल्याचे श्री.देरकर यांनी सांगितले.

अव्वा की सव्वा आलेल्या वीज बिलामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच महावितरणकडून वीज बिल न भरणा-यांना वीज कट करण्याचा इशाराही दिला जात असल्याने नागरिकांना एवढी मोठी वीज बिले कशी भरावीत असा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज बिलात आकारणी केलेली रक्कम फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांना सरासरी देण्यात आली वीज बिले कमी करून नागरिकांना दिलासा मिळावा या मागणीसाठी सोमवारी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोनाच्या संसर्गावरुन सर्वाेच्च न्यायालय गंभीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या