34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeपरभणीउत्कृष्ट कामगिरी बजावणा-या पोलिस अधिकारी-कर्मचा-यांचा गौरव

उत्कृष्ट कामगिरी बजावणा-या पोलिस अधिकारी-कर्मचा-यांचा गौरव

एकमत ऑनलाईन

परभणी : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते शनिवारी (दि.27) जिल्हा पोलिस दलातील उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी – कर्मचा-यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार आदिंची उपस्थिती होती.

विशेष पोलिस उपमहानिरीक्षक श्री. तांबोळी हे वार्षिक तपासणीनिमित्त जिल्हा दौ-यावर आले आहेत. शहरातील नवामोंढा पोलिस ठाण्याची शुक्रवारी (दि.26) त्यांनी वार्षिक तपासणी केली. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयातील विक्रांत स्पोर्टस मैदानासह अत्याधुनिक जीमचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ग्रामीण पोलिस ठाण्यातील व्हॉलीबॉल मैदानाचेही उद्घाटन श्री.तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा पोलिस दलातील उत्कृष्ट कार्य करणा‍-या अधिकारी – कर्मचा-यांसह पोलिस अधीक्षक कार्यालयातील कर्मचा-यांना शनिवारी श्री.तांबोळी यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यात फौजदार चंद्रकांत साखरे, सहाय्यक फौजदार श्याम अंबेकर, कर्मचारी शेख रौनक शेख खाजामिया, ग्यानदेव बेंबडे, रघुवीर देशपांडे यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तर ग्रामपंचायत निवडणूक संदभात निवडणूक सेलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कर्मचारी सुनील गरुड, जरार अहमद जुल्फेखार अहेमद, सुरेखा घोगरे, संतोष व्यवहारे, राजेश जटाळ, अमर चाऊस यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय मोटर परिवहन पर्यवेक्षक सय्यद साजिद हुसैन, मोहमद हेरेस मोहमद युसूफ अन्सारी, पोलिस निरीक्षक रमाकांत बनसोडे, उमेश पाटील, राखीव पोलिस निरीक्षक रविंद्र दामोदर, राखीव फौजदार शामलाल राठोड यांचाही विशेष पोलिस उपमहानिरीक्षक श्री. तांबोळी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या शिवाय पोलिस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेतील आशा देशपांडे, ग्रिष्मा कदम, अस्थापना शाखेतील दिलीप सावंत, पत्र व्यवहार शाखेतील देवदत्त पवार, विभागीय चौकशी शाखेतील ओमप्रकाश कोटरवार, प्रबंधक अनंता गमे, पत्र व्यवहार शाखेतील श्रीकृष्ण सोमवंशी, दीपक गजभार, संतोष भोसले, पल्लवी देशमुख, गोविंद फुफाटे, रुपा कासेवाड, कविता गुट्टे, गंगाधर होले, रविंद्र आसोरे, मीरा केंद्रे, गुलाब बुक्तरे, प्रवीण वायाण, दिपाली पाटील, विठ्ठल बोबडे, नाजिया शेख, अशोक शिंदे, राजेश गायकवाड, समीर शेख आदींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७० रूग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या