33.5 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeपरभणीश्रीराम जन्मोत्सवानिमित्त आईस्क्रीम वाटप, गो पूजन

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आईस्क्रीम वाटप, गो पूजन

एकमत ऑनलाईन

सोनपेठ : श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठानच्या वतीने शहरात आणि ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून शहरात श्री राम जन्मोत्सवानिमित्त श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी वांकर, सचिव डॉ.बालाजी पारसेवार यांच्या संकल्पनेतून शहरात सुमारे ०५ हजार आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले. तसेच शहरातील आठवडी बाजारात सायखेडा येथील गो शाळेतील सुमारे ५०० गाईंचे पूजन करण्यात आले होते.

रंगनाथ महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोनपेठ शहरात गोरगरिबांच्या कल्याणात व गो सेवेचे वृत्त चालवले असून राम जन्मोत्सवानिमित्त गो पूजनही करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे सुभाष कदम, ज्ञानेश्वर ढमढेरे, नंदकुमार कोटलवार, जीवन बसेट, जितेंद्र वांकर, प्रशांत पांपटवार, आनंद डाके, राहुल लोहगावकर, केदार वलसेटवार, अनिल कवटीकवार, महेश रुद्रवार, विष्णू ढमढेरे, प्रवीण सातभाई यांच्यासह स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला होता. यावेळी मिरवणुकीत सोनपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक मंचक फड यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या