जिंतूर : शहरातील महामार्ग रस्त्यावर असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकातील एक फॅमिली हाटेल मध्ये मद्य विक्रीचा कोणताही परवाना नसताना संचारबंदी च्या काळात अवैध रित्या मद्य विक्री साठी साठा करून ठेवल्याचा माहितीवरून शहर पोलिसांनी सदर हाटेलवर 26 जुलै रोजी सकाळी 9 च्या सुमारास धाड टाकुन सुमारे 3795 रुपयांची अवैध दारू साठा जप्त केला या बाबत हाटेल चालक गजानन लहानुआपा पुणेकर याच्या विरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत राम पौळ यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की ते व सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ, स्वामी,चव्हाण हे सोमवारी शहरात संचारबंदी असल्याने गस्त घालत असतांना पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी त्यांना पुणेकर हाटेल मध्ये अवैध रित्या विक्री करण्यासाठी दारू साठा ठेवला असल्याची माहित दिली त्यावरून ते त्या ठिकाणी गेले असता सदरील हाटेल बंद होते त्यांनी हाटेल चालक गजानन पुणेकर यास बोलावून हाटेल उघडून तपासले असता फ्रीज मध्ये बियर च्या 23 बाटल्या ज्याची अंदाजे बाजार भाव किंमत 3795 रुपयांची दारू मिळून आले आहे.
Read More सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डचे लोकार्पण