22 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeपरभणीआहेरवाडी येथे मुख्याध्यापकांना धक्काबुक्की, गुन्हा दाखल

आहेरवाडी येथे मुख्याध्यापकांना धक्काबुक्की, गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

पूर्णा : तालुक्यातील आहेरवाडी येथील महाविद्यालयात शनिवार, दि़१४ जानेवारी रोजी मुख्याध्यापकांना धक्काबुकी करीत शिक्षकांना शिवीगाळ करीत धमकी दिल्याची व मुलींनाही अडवून दहशत निर्माण केल्याची घटना घडली़ या प्रकरणी मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून ११ आरोपी विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून अन्य आरोपी फरार असल्याचे समजते.

पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील एका महाविद्यालयात दि़१४ जानेवारी रोजी सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान काही लोकांनी मुख्याध्यापकास शिवीगाळ करीत शिक्षकांना धक्काबुक्की करीत धमकी दिली़ तसेच विद्यार्थीनींना अडवत दहशत निर्माण केल्याची घटना घडली़ या प्रकरणी मुख्याध्यापक संभाजी खंदारे यांनी पूर्णा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केल्याने ११ आरोपी विरोधात बालकांचे लैंगिक शोषण कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनिग़ायकवाड करत आहे़ या प्रकरणी फक्त ०१ आरोपी पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.

हे अद्याप १० आरोपी फरार असल्याचे समजते. पूर्णा तालुक्यात आणि शहरात शाळेकरी तथा महाविद्यालयिन विद्यार्थीनींना छेडछाड करून त्रास देण्याचा घटनेत वाढ होत आहे़ नुकतेच शहरातील एका शाळेकरी अल्पवयीन विद्यार्थीनिस छेडछाड केल्याची घटना ०५ जानेवारी रोजी घडली होती. त्यानंतर तालुक्यातील बरबडी येथे एका तरूणीने छेडछाडीस कंटाळून विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता आहेरवाडी येथील महाविद्यालयात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान दामिनी पथक नसल्याने तथा पोलिसांचे वचक नसल्यामुळे तालुक्यासह शहरात रोडरोमियोंचा उच्छाद झाला आहे़ त्यामुळे विद्यार्थीनीचे शाळेत व महाविद्यालयात जाने खूप अवघड झाले आहे. रोडरोमियोंच्या नेहमीच्या त्रासामुळे पालकवर्ग चिंतेत असल्याचे दिसत आहे़ याकडे पोलीस अधीक्षक रागसुधा आऱ यांनी लक्ष देवून रोड रोमियोचा बंदोबस्त करण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलिस अधिका-याची नेमणूक करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या