24.7 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या पोहचली हजारावर

परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या पोहचली हजारावर

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावाने जिल्हा अक्षरश: होरपळून निघाला आहे. गेल्या काही दिवसात रूग्ण संख्या कमी होत असली तरी मृतांचा आकडा मात्र मोठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा एक हजारांच्या पुढे गेला असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मागील वर्षभरात कोरोनाने मृत्यू झालेल्या संख्येच्या तुलनेत केवळ यावर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाने मृत्यू झालेल्याची संख्या दुप्पट एवढी झाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात १७९ तर दुस-या पंधरवाड्यात २७४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यू दर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने १ हजार ६ जणांचा वर्षभरात बळी गेलेला आहे. यात केवळ एप्रिलमध्येच मृत्यू झालेल्यांची संख्या ही ४५३ आहे. जिल्ह्याचा हा मृत्यूदर राज्याच्याही मृत्यूदरापेक्षा जास्त असल्याची कबुली स्वत: पालकमंत्री नवाब मलीक यांनी दिली होती. ग्रामीण भागातील नागरिक आरटीपीसीआर किंवा रॅपीड अँटीजन टेस्टला घाबरत असून दुखणे अंगावर काढण्यामुळेच हे प्रकार होत असल्याचा दावा पालकमंत्री मलीक यांनी केला होता. परंतू एप्रिलच्या दुस-या पंधरवाड्यातील मृत्यूची संख्या पाहता केवळ हेच कारण पुरेसे ठरू शकत नाही.

जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत सुमारे 436 जणांचा वर्षभरात मृत्यू झाला अह्याहे. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या एका आकड्यात होती. १ ते ७ एप्रिल दरम्यान ७ जणांचा मृत्यू झाला होता. ८ एप्रिलनंतर हा आकडा दोन अंकी झाला. ८ ते १५ एप्रिल दरम्यान सर्वाधिक संख्या २० इतकी नोंदली गेली. एकुणच एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांत १७९ जणांचा कोरोनाने बळी घेतला. तर दुस-या १५ दिवसात एकूण २७४ जणांचा असा एकुण ४५३ जणांचा कोरोनाने बळी घेतला असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही मृत्यूची संख्या वाढली आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी सुरूवातीचे काही कोरोना रूग्ण संख्या बाबतीत जिल्हा ग्रीन झोन होता. परंतू त्यानंतर हळूहळू रूग्णसंख्या वाढत जाण्यास प्रारंभ झाला. यावर्षी तर एप्रिल महिन्यापासून कोरोनाने कहर सुरू केला. एप्रिल महिन्यात अनेकवेळा रूग्णसंख्येने हजाराचा आकडा पार केला होता. त्यामुळे दररोज मृत्यू पावणा-यांची संख्या देखील दोन आकडी होती. त्यामुळे साहजिकच कोरोना रूग्णांच्या संख्येने हजाराचा आकडा पार केला असून नागरिकात चिंतेचे वातवरण आहे.

कोरोना हाताळण्यात मोदी सरकार अपयशी – लॅन्सेट चा अहवाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या