23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeपरभणीपाथरीत सहा वस्ती, गल्लीची जातीवाचक नावे बदलली

पाथरीत सहा वस्ती, गल्लीची जातीवाचक नावे बदलली

एकमत ऑनलाईन

परभणी : पाथरी नगर परिषदेने शासन निर्णयानुसार शहरातील वस्ती, गल्ली व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्यांना महापुरूषांची नावे देण्याचा ठराव मंजूर केला आहे़ तसेच याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय समितीस पाठवण्यात आला असल्याची माहिती नगर परिषद प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबईने दि़ ११ डिसेंबर २०२० आणि प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या शासन निर्णय दि. ६ मे २०२१ अन्वये राज्यातील वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यामुळे ही सर्वनावे बदलून या ऐवजी महापुरूष व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने वरील शासन निर्णयानुसार वस्त्या, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने परभणी समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्यावतीने दि़२५ जून २०२१ रोजी आणि विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्यावतीने विभागीय समिती आयोजित दि. २६ जुलै व १० मे २०२२ रोजीच्या बैठकीतील सुचनेनुसार जिल्हास्तरावर जातीवाचक नावे असलेल्या गावांची, वस्त्यांची व रसत्यांच्या नावांची खात्री करून घ्यावी व अशी जातीवाचक नावे बदलून महापुरूषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सुचना दिल्या होत्या. या सुचनांप्रमाणे जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यात आलेले प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीस सादर करण्यात आला आहे.

तसेच वरील प्रमाणे नगर विकास विभागाने शहरी भागासाठी जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याची कार्यवाही तातडीने करावी अशा सुचना दिल्या होत्या़
शासनाच्या सुचनेनुसार पाथरी नगर परिषद हद्दीतील एकुण ६ सहा वस्ती, गल्लीची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे दिल्याचा ठराव दि़१८ जुलै २०२२ रोजी मंजूर केला आहे. यामध्ये पुर्वीच्या माळीवाडाचे नाव बदलून संत सावता नगर, पारधीवाड्याचे नाव बदलून जयभवानी नगर साईरोड, ब्राह्मण गल्लीचे नाव बदलून परशुराम नगर, ढोर गल्लीचे नाव बदलून रोहिदास नगर, कुंभार गल्लीचे नाव बदलून संत गोरोबा नगर, सोनार गल्लीचे नाव बदलून संत नरहरी नगर असे नवीन नाव देण्यात आले आहे़ शहरातील संबंधित सहा वस्ती, गल्लींचे जातीवाचक नाव बदलून नवीन नाव देण्यात आल्याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय समितीस पाठवला असून नागरीकांनी याची नोंद घ्यावी, असे पाथरी नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी कळवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या