23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्राइमजिंतूर तालुक्यातील सायखेडात भावानेच केला भावाचा निर्घृण खून

जिंतूर तालुक्यातील सायखेडात भावानेच केला भावाचा निर्घृण खून

एकमत ऑनलाईन

परभणी : प्रतिनिधी
क्षुल्लक कारणावरून दोघा भावातील वाद विकोपाला गेला त्याचे पर्यावसन खुनामध्ये झाले .जिंतूर तालुक्यातील सायखेडा या गावी रामराव जाधव याने रागाच्या भरात त्याचा सख्खा भाऊ शेषराव जाघव यांच्या डोक्यात कुºहाडीचे घाव घातले तो रक्तांच्या थारोळ्यात पडला उपचारार्थ परभणी येथे नेत असतांना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शेळ्या चारू न देण्याच्या कारणावरून भावानेच सख्या भावाचा डोक्यात कु-हाडीने वार करीत निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील सायखेडा या गावी मंगळवार १९ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली.
जाधव कुटुंबातील रामराव जाधव व शेषराव जाधव या दोघा सख्या भावात मंगळवारी अगदी शुल्लक गोष्टीतून म्हणजे शेतात शेळ्या चारू न देण्याच्या कारणावरून वादविवाद झाला. त्यातून दोघे एकमेकांच्या अंगावर धावले.

Read More  देशभरातील स्मार्टफोन युझर्सला सर्बेरस व्हायरसचा धोका

रामराव(वय58) याने रागाच्या भरात भाऊ शेषराव(वय55) यांच्या डोक्यात कु-हाडीचे घाव घातले. त्यात शेषराव हे गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. प्रत्यक्षदर्शीनी त्यांना तातडीने जिंतूरला हालविले. परंतू प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना तात्काळ परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. कुुटुंबायातील काहीनी शेषराव यांना गंभीर जखमी अवस्थेत परभणीत हलविण्याचा प्रयत्न केला. परंतू वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर जिंतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे, चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बळवंत जमादार पोलीस उपनिरीक्षक पि.जी.अलापुरकर,पो.हे.कॉ. इरफान इनामदार,पोलीस नायक डि.डी.बुकरे, सुयर्वंशी,भानुसे आदीं पोलीसांनी घटनास्थळी येथे भेट देऊन आरोपी भावाला ताब्यात घेतले. या प्रकरणी मयताची पत्नी सावित्रा शेषराव जाधव यांच्या फिर्यादी वरून आरोपी रामराव जाधव यांच्या विरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास चालू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या