30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeपरभणीपरभणीत संचारबंदी नावालाच, रस्त्यावर गर्दी कायम

परभणीत संचारबंदी नावालाच, रस्त्यावर गर्दी कायम

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी रात्रीपासून १५ दिवसाचा लॉकडाऊन लागु केला असतांना गुरूवारी पहिल्याच दिवशी परभणीच्या बाजारपेठेतील रस्त्यावर गर्दी कायमच असल्याचे दिसून आले. परभणीसह राज्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. परभणी जिल्ह्यात तर आतापर्यंतची ११७२ इतर सर्वात उच्चांकी संख्या बुधवारी आढूळन आली. जिल्ह्यात मागील आठवडाभरापासुन दररोज किमान ४०० च्या वर कोरोनाचा रूग्ण आढळून येत आहेत. त्यातच उपचारादरम्यान मृत्यूची संख्याही वाढतांना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र नागरिकांकडून नियमाचे पालन होत नसल्याने कोरोना रूग्ण संख्येत वाढ होतांना दिसत आहे. राज्य शासनाने बुधवार दि. १४ रोजीच्या रात्री ८ वाजेपासुन १ मेच्या सकाळपर्यंत अत्याश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद केले आहेत. रस्त्यावर होणा-या गर्दीला नियंत्रीत करण्यासाठी राज्य शासनाने कठोर पाऊल उचलले आहे. परंतु आज पहिल्याच दिवशी परभणीत मात्र या निर्णयाकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

शहरातील सर्वच रस्त्यावर भाजीपाला, किराणा माल घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच रस्त्यावर वाहतुकही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले. मुख्य रस्त्यासह इतर रस्त्यावरील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानेही अर्धवट शटर ठेवत चालु असल्याचे चित्र पहावयास मिळाले. प्रशासनाने कठोर निर्बंध घातले असतांनाही नागरिक मात्र मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचे चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

उपजिल्हाधिकारी कुंडेटकर उतरले रस्त्यावर
जिल्ह्यात लॉकडाऊन लागु केला असतांना रस्त्यावर गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर दुपारी रस्त्यावर उतरले व विनाकारण फिरणा-या नागरिकांवर कारवाई केली. परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढती रूग्ण संख्या पाहता प्रशासनाने कठोर निर्णय घेतले आहेत. मात्र परभणीकर नागरिक मात्र रस्त्यावर गर्दी करतांना दिसत आहेत.

सकाळपासूनच रस्त्या-रस्त्यावर नागरिक व वाहने मोठ्या प्रमाणात दिसत होती. ही परिस्थिती लक्षात घेवून उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी दुपारी परभणीतील रस्त्यावर विनाकारण फिरणा-या नागरिकांवर कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. मुख्य रस्त्यासह इतर रस्त्यावरून फिरणा-या नागरिकांवर कारवाई करताच काही अंशी गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रेमडेसिवीर निर्यात बंदी केलेला माल घेण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या