24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeपरभणीयेलदरीत प्रतिकात्मक वारी काढून केले विठ्ठलाचे नामस्मरण

येलदरीत प्रतिकात्मक वारी काढून केले विठ्ठलाचे नामस्मरण

एकमत ऑनलाईन

जिंतूर : तालुक्यातील येलदरी कँप येथे कोरोनामुळे वारी बंद झाल्याने वारक-यांनी गावातच प्रतिकात्मक वारी काढून केले श्री विठ्ठलाचे नामस्मरण. कोरोनाचे सर्व नियम पाळून, सामाजिक अंतर राखून हा पालखी सोहळा आषाढी एकादशी नंतर येणा-या आषाढ पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते.

पण यंदाही कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे पायी वारीला शासनाने परवानगी दिलेली नाही. सतत दुस-या वर्षी पंढरपूरची वारी सुटू नये म्हणून येलदरी येथील वारकरी संप्रदायातील मधुकर सनईकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापासून गावातच दररोज पायी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला. या दिंडी सोहळ्यात येलदरी येथील भजनी मंडळासह वारकरी संप्रदायातील अनेक भक्तगण सामील होत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाच्या या वारीला परंपरा आहे.

परंपरांमध्ये खंड पडू नये अशी अपेक्षा मधुकर सनईकर यांना वाटले आणि त्यावर उपाय म्हणून त्यांनी येलदरी परिसरातील भजनी मंडळींच्या सहकार्याने गावातच पायी चालत वारीचा पर्याय उपलब्ध करून दिला. या वारीला चांगलाच प्रतिसाद मिळत असून दिवसेंदिवस वारीतील वारक-यांची संख्या वाढत आहे. पायी दिंडीतील भक्तांना गावातील नागरिकांकडून चहा, पाणी, नाष्ठा दिला जात आहे. पायी वारीच्या उपक्रमात मधुकर सनईकर, बाबुराव मुळे, कोंडीबा रणबावळे, शामराव जाधव, दिगंबर होडबे, बबन माकोडे, भास्कर कापुरे, गणेश स्वामी, व्यंकटेश सोनकेपल्ली, गणेश ढाकणे, विजय जैस्वाल आदींनी पुढाकार घेतला आहे. या नाविन्यपूर्ण वारीचे कौतुक होत आहे. तर वारीला जाता न येणा-या श्री विठ्ठल भक्तांना वारीमध्ये गेल्याचा आनंद मिळत आहे.

लॅम्बडा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही जास्त धोकादायक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या