23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीपरभणीतील आयकर कार्यालय लवकरच सुरू करणार ; डॉ.भागवत कराड

परभणीतील आयकर कार्यालय लवकरच सुरू करणार ; डॉ.भागवत कराड

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी येथील बंद केलेले आयकर कार्यालय पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके व कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष ऍड.राजकुमार भांबरे यांनी औरंगाबाद येथे शनिवार, दि. २१ मे रोजी भेट घेवून निवेदनाद्वारे केली.

यावेळी डॉ. कराड यांनी परभणीतील आयकर कार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हे कार्यालय पुन्हा सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, परभणी येथे १९६३ पासून सुरू असलेले आयकर कार्यालय बंद करून ते हिंगोली येथे स्थलांतरीत कण्यात आले आहे. विशेष म्हणजे परभणी येथे स्वत:च्या इमारतीत आयकर कार्यालय सुरू असताना हिंगोली येथे भाड्याच्या इमारतीत हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील करदाता, कर सल्लागार आणि चार्टर्ड अकाउटंट यांना हिंगोली येथे जावून या कार्यालयाशी संबंधीत कामकाज करण्यास अनेक अडचणी येत आहेतÞ त्यामुळे वरील सर्व गोष्टींचा विचार करून परभणीतील आयकर कार्यालय पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे संजय शेळके व ऍड. राजकुमार भांबरे यांनी शनिवारी औरंगाबाद येथील कार्यालयात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट घेवून त्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.

यावेळी डॉ. कराड यांनी श्री. शेळके व ऍड.भांबरे यांच्याशी उपरोक्त विषयावर चर्चा करून सविस्तर माहिती घेतली व परभणीतील आयकर कार्यालय लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले आहे. आश्वासनामुळे परभणी जिल्ह्यातील आयकर दात्यांसह, करसल्लागार व चार्टड अकाउंटट यांना दिलासा मिळाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या