24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeपरभणीहरबरा खरेदीचा कोटा वाढवा : ‘स्वाभिमानी’चे निषेध आंदोलन

हरबरा खरेदीचा कोटा वाढवा : ‘स्वाभिमानी’चे निषेध आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : नाफेड अंतर्गत हरबरा खरेदीसाठीचा कोठा राज्य सरकारने तत्काळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवार, दि. ३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध आंदोलन केले. सोमवारपर्यंत हरबरा खरेदीचा कोटा वाढवून न दिल्यास शेतक-यांचा हरबरा जिल्हाधिकारी कार्यालयात आणून त्यावर बसून आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे म्हणाले, नाफेडकडून हरबरा खरेदीसाठी दररोज २० ते २५ शेतक-यांना बोलावण्यात येते. परंतु, सगळा हरबरा खरेदी केला जात नसल्याने अनेक शेतक-यांना वाहनांचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे पणन महासंघाने हरभरा खरेदी तात्काळ सुरू करून राज्य सरकारने आपला खरेदी कोटा तत्काळ वाढवून खरेदीचे आदेश द्यावेत. अडवणूक झालेल्या शेतक-यांना वाहन भाडे देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

आज या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाय-यांवर बसून घोषणाबाजी करून वाहनांमधून हरभरा खाली उतरवण्यात आला. तत्काळ खरेदी सुरू करा अन्यथा सोमवारी हरब-याच्या वाहनांवर बसून आमरण उपोषण करणार असल्याचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी सांगितले.

या आंदोलनात किशोर ढगे, मुंजा लोढे, कृष्णा गरुड, शेख जाफर, विकास भोपळे, एकनाथ कदम, अर्जुन बागल, प्रसाद गरुड, अमोल पवार, माणिक देशमुख, राम गोळेगावकर, नरहरी बोबडे, दत्ता बोबडे, भारत पवार, विष्णू काळे, नागनाथ तरवाटे, उत्तम गायकवाड, वसंत लावंदे यांनी सहभाग घेतला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या