22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeपरभणीकोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ शनिवार-रविवारी संचारबंदी

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ शनिवार-रविवारी संचारबंदी

एकमत ऑनलाईन

मोहन धारासूरकर परभणी : देशात व राज्यात कोरोनाचा कहर वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पाश्वर्भुमीवर शनिवार २५ व रविवार २६ जुलैं रोजी परभणी महानगरपालिका व जिल्ह्यातील नागरी भागात संचारबंदी लागू राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

जिल्ह्यात मागील आठवड्यात संचारबंदी लागू केल्याने अनेक दिवस बाजारपेठ बंदच होती. गंगाखेड तालुक्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्या परिसरातील गावचे लोक खरेदीसाठी पालम शहरातील बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. त्यामुळे पालम शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिका‍-यांनी गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून २६ जुलैंच्या मध्यरात्री १२ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. पालम शहर व ३ किमी परिसरात हे आदेश लागू आहेत. त्यामुळे गंगाखेड व पालम शहर वगळता जिल्ह्यात इतर सर्वत्र बहुतांश व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहेत. जिल्हाधिका-यांनी यापुर्वी दर शनिवारी व रविवारी बाजारपेठ बंद राहील, असे आदेश काढले होते. सोमवारपासून बाजारपेठ सुरु झाल्यानंतर शनिवार दि.25 व रविवार दि.26 जुलैं रोजी बाजारपेठ चालू राहणार की नाही? या संदर्भात व्यापारी, नागरिक, शेतकरी यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे. शनिवार व रविवार दोन दिवस बाजारपेठ बंद राहणार असल्याची माहीती दिली.

जिल्हयात कोरोनामुळे अनेकांचा बळी
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून २४ जुलै रोजी पहाटे ३.१५ वाजता परभणी शहरातील फेरोज सिनेमागृह परिसरातील रहिवासी ५० वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला.आतापर्यंतचा जिल्ह्यातील हा 20 वा बळी आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 458 झाली आहे. यातील 20 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 214 जण कोरोनामुक्त झाले असून 228 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read More  बँकेतून पैसे काढण्यासाठी झुंबड

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या