27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीजिल्हयात कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

जिल्हयात कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आजवर ५७५ रुग्ण कोरोना बाधीत असून सुट्टी होवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २६९ तर एकूण मयताचा आकडा २६ आहे. सध्या कक्षात भरती असलेल्या रुग्णांची संख्या २८० आहे तर कक्षात नवीन दाखल झालेले संशयीत रुग्ण ५१ आहे. जिल्हयात आजपर्यंत एकूण संशयीत रुग्णांची संख्या ४५०० त्यात विलगीकरण १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झालेले ३५२८ रुग्ण आहेत दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गुरुवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात गंगाखेडातील ११, परभणीतील ७, मानवत व पाथरीतील एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६४५ झाली आहे.गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्लीतील ५२ वर्षीय महिला,२६ वर्षीय पुरुष, ५५ वर्र्षीय पुरुष, नवा मोंढा भागातील ५० वर्षीय पुरुष, दिंगंबरपुरा येथील ३७ वर्षीय पुरुष, आॅटो नगरातील ५५ वर्षीय महिला, खडकपुरा भागातील ५३ वर्षीय महिला, ढिंगपिंपळा येथील ३७ वर्षीय पुरुष, पोस्ट कार्यालयाजवळ ११ वर्षाचा मुलगा, २७ वर्षीय महिला, ८२ वर्षीय पुरुष, भाग्य नगरातील ४५ वर्षीय महिला, नवीन मोंढा भागातील ३९ वर्र्षीय पुरुष बाधित आढळला आहे. परभणीतील गुलशनबाग परिसरातील ४० वर्षीय पुरुष, त्रिमुर्ती नगरातील ५६ वर्षीय महिला, नवा मोंढा भागातील ७५वर्षीय पुरुष, काला बावर भागातील ४९ वर्षीय महिला, दत्त नगरातील ७२ वर्षीय पुरुष, कुर्बान अलीशहा नगरातील ६३ वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे. पाथरी शहरातील कोमटी गल्लीतील ४५ वर्षीय पुरुष तर मानवत तालुक्यातील मानोली येथील ६५ वर्षीय पुरुषाचा आणि जालना जिल्ह्यातील मंठा येथील २८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.या काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पॉझटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घरात चोरीचा प्रयत्न
शहरातील बसस्थानक ते रेल्वेस्थानक मार्गावरील वसाहतीत एका कुटुंबातील सदस्य मागील आठवड्यात औंरंगाबाद येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना सध्या शहरातील एका मंगल कार्यालयात कोरोन्टाईन करण्यात आले आहे. त्यामुळे घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्या घरात चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज गुरुवार दि.30 जुलैं रोजी सकाळी उघडकीस आला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नोकरीस असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकजण कोरोनाबाधित आढळला असून त्याच्यावर औंरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. त्याचे वास्तव्य असलेल्या परभणीतील घराचा परिसर प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. तसेच घरातील सर्व कुटुंबियांना अन्य ठिकाणी कोरोन्टाईन केले आहे. त्यामुळे घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बुधवारी रात्री त्याठिकाणी प्रवेश करीत चोरीचा प्रयत्न केला.

Read More  रुग्णालयाचा गलथान कारभार सुधारावा अन्यथा आंदोलन

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या