22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeपरभणीमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गतच्या कामांची चौकशी करा : माजी आ. भांबळे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गतच्या कामांची चौकशी करा : माजी आ. भांबळे

एकमत ऑनलाईन

जिंतूर : जिंतूर व सेलू तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरु असलेल्या बोगस कामांची सखोल चौकशी करावी अशी मागणी माजी आ. विजयराव भांबळे यांनी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जिंतूर व सेलू या दोन तालुक्यामध्ये मागील सन २०२०-२०२१ मधील जोड रस्ता जांब (बु) ९५ लक्ष, जोड रस्ता सोरजा- १२० लक्ष, रामा ते शेक १७० लक्ष, चामनी ते तेलवाडी रस्ता १५५ लक्ष, येसेगाव ते कडसावंगी रस्ता ६९५ लक्ष, प्रजीमा २ ते बेलोरा तांडा रस्ता १०० लक्ष, रामा २५३ ते काजळी रोहीना ४०० लक्ष, जोडरस्ता कुडारोड २०० लक्ष, रामा २५३ ते पिंपराळा रस्ता ६५ लक्ष, रामा २५३ ते वाकि ५५ लक्ष ही कामे सुरु आहेत. या कामांचा दर्जा अतिशय निकृष्ठ आहे. या सर्व बोगस कामांची मुद्देनिहाय चौकशी करण्यात यावी.

त्यात वरील कामांना संबधित खात्यांनी कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ते काम विहित मुददीत पूर्ण करणे गरजेचे असताना ब-याच कामाची मुदत संपलेली आहे. त्यामुळे या सर्व कामांना नियमानुसार दंड लाऊन संबधित गुत्तेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे. सर्व कामांची इतर जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी यांची उच्चस्तरीय समिती गठीत करून सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच शासनाच्या पैशाचा अपहार केल्या प्रकरणी संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच चौकशी पूर्ण होऊन आहवाल येईपर्यंत कुठलेही देयके देण्यात येऊ नयेत अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे भांबळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या