30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeपरभणीपरभणीत केंद्रीय पथकाकडून पाहणी

परभणीत केंद्रीय पथकाकडून पाहणी

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोनाच्या वाढत्या प्रादूभार्वाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना संसर्गासह उपाययोजनांबाबतचा आढावा केंद्रीय पथकाने घेण्यास सुरवात केली असून जिल्हा शासकीय रुग्णालयासह शहरातील कोविड व व्हॅक्सिनेशन सेंटरला पथकाने भेटी दिल्या. जिल्ह्यात गुरुवारी (दि.आठ) केंद्राचे दोन सदस्यीय पथक दाखल झाले. यात पथकात पाँडेचेरी येथील असिस्टंट प्रोफेसर डॉ. दिनेश बाबू व नागपूर येथील असोसिएट प्रोफेसर श्रीमती डॉ. रंजन सोळंकी यांचा समावेश आहे. परभणीत दाखल होताच सदस्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

या चचेर्तून त्यांनी प्राथमिक माहिती घेतली. तसेच पुढील नियोजन यावेळी करण्यात आले. शुक्रवारी या पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटरसह व्हॅक्सिनेशन सेंटरला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ, प्रकाश डाके, डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह आदी वैद्यकीय अधिकारी त्यांच्यासमावेत होते.

पथकातील सदस्यांनी शहरातील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यात त्यांनी रुग्णांना देण्यात येणार्‍या सोयीसुविधा, उपचार याबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर व्हॅक्सीनेशन सेंटरला भेटी देत तेथील अधिकारी – कर्मचा‍-यांशी चर्चा केली. पाथरी रस्त्यावरील डॉ. प्रफुल्ल पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पथकाने भेट दिली. त्यावेळी तेथील लसीकरण केंद्रासही भेट दिली. दरम्यान प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनाबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले.

गुंडलवाडी शिवारात प्रेमीयुगलाची आत्महत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या