24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीपरभणीत सात ते दहा सप्टेंबर दरम्यान आंतरराज्य अंिजक्य व स्पर्धा

परभणीत सात ते दहा सप्टेंबर दरम्यान आंतरराज्य अंिजक्य व स्पर्धा

एकमत ऑनलाईन

परभणी : योनेक्स सनराईस पश्चिम विभागीय अंतर – राज्य अंिजक्यपद स्पर्धेचे दि. ७ सप्टें ते १० सप्टें. या कालावधीत परभणी येथे होणार आहे. या स्पर्धेत ५ राज्यातील वरिष्ठ गट व कनिष्ठ मुले (१९ वर्षाखालील) असे प्रत्येकी २ संघ सहभागी होणार आहे. या संघांमध्ये अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय बॅडंिमटन खेळाडूंच सहभाग राहणार आहे.

भारतीय बॅडमिंटन संघटना व महाराष्ट्र बॅडंिमटन संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा शटल बॅडमिंटन संघटना या पश्चिम विभागीय आंतर राज्य स्पर्धेचे यजमान पद भुषवित आहे. यापूर्वी जिल्हा संघटनेने ४ राज्यस्तरीय बॅडंिमटन स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन केले होते. त्याच बरोबर पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ तसेच राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय स्पर्धेचेही आयोजन करुन मराठवाड्याच्या नाव लौकिकात भर घातलेली आहे.

जिल्हा संघटनेने गेल्या २० वर्षात अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडविले असून संघटनेच्या या यशस्वी वाटचालीमुळे यंदाची पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा मान संघटनेला मिळाला आहे. या निमित्ताने गेल्या २ महिन्यांपासून स्पर्धेचे जय्यत तयारी सुरु आहे. विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या बॅडमिंटन कोर्टवर होणा-या या सामन्यांच्या निमित्ताने परभणीकर क्रीडा रसिकांना राष्ट्रीय स्पर्धा पाहण्याची मेजवाणी मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय खेळाडुंचे कौशल्य जवळून अनुभवता येणार आहे.

तसेच स्पर्धेसाठी पंच, बॅडमिंटनमधील तज्ज्ञ व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे वरिष्ठ पदाधिकारी या निमित्ताने उपस्थित राहणार आहे . स्पर्धेत पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश व छत्तीसगड या ५ राज्यातील वरिष्ठ गट व कनिष्ठ मुले १९ वर्षाखालील असे दोन संघ या ५ राज्यातून येणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन दि. ७ सप्टें २०२२ रोजी होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदि सह राष्ट्रीय व राज्य बॅडमिंटन संघटनेने पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष विजय जामकर, व सचिव रविंद्र पतंगे देशमुख यांनी दिली. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष सचिन अंबिलवादे, डॉ . शाम जेथलिया, कोषाध्यक्ष सुधीर मांगुळकर, सहसचिव आशिष शाह, सदस्य विजय मुंदडा, विनोद जेठवाणी , नरेंद्र झांजरी, पांडुरंग कोकड, भगवान खैराजानी, उन्मेश गाडेकर , इंद्रजित वरपुडकर व सुनिल देशमुख, विकास जोशी, संकेत सोमवंशी, रुषभ फुरसुले, सतिष सुपेकर, अमोल ओझलवार, जे. डी. सोमाणी, सुनिल कालानी आदि पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या