कौसडी : जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथील केशव काशिनाथ शेटे वय ४६ वर्षे गावालगतच्या ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात दि. २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता वाहून गेले़ नागरिकांनी तेव्हापासून शोध सुरू केला आहे. परंतू अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे परीसरात जोरदार पाऊस झाल्याने ओढ्याला पूर आला होता. या पुराच्या पाण्यात केशव शेटे वाहून गेले़ गावातील नागरिकांनी तेंव्हापासून शोध सुरू केला आहे. परंतू अद्याप त्यांचा पत्ता लागला नाही. वाघी बोबडे येथील तलाठी शेख खलील व बोरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत मुळे, बीट जमादार शंकर टाकरस यांनी शोध घेतला. परंतू अद्याप शेटे सापडले नाहीत. याबाबत प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलून शेटे यांचा शोध लावावा अशी मागणी गावक-यातून होत आहे.