23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeपरभणीमानवतमध्ये पकडलेली औषधी बनावट असल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट

मानवतमध्ये पकडलेली औषधी बनावट असल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट

एकमत ऑनलाईन

परभणी : मानवत तालुक्यात काही दिवसांपूर्वी शेतीविषयक तणनाशक, बियाणे व फवारणीसाठी लागणारी बनावट औषधी पकडण्यात आली होती़ पकडण्यात आलेल्या औषधीचे नमुने औरंगाबाद येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते़ याचा अहवाल प्राप्त झाला असून सदरील औषधी बनावट असल्याची माहिती शेतकरी बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य संघटक सुनिल बावळे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

बनावट औषधी संदर्भात सुनिल बावळे पाटील यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, मानवत येथे ९ ऑगस्ट २०२२ रोजी बनावट औषधी विक्री करण्यात येत असल्याचे प्रकरण शेतक-यांनी उघडकीस आणले होते़ परभणी जिल्ह्यात तणनाशक, बियाणे, फवारणीची औषधी खरेदी केल्यानंतर त्याचा उपयोग होत नसल्याच्या तक्रारी होत्या.

नामांकित कंपन्यांचे औषध वापरूनही फारसा उपयोग होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता़ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय मार्फत जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी यांनी पकडण्यात आलेल्या बनावट औषधीचा नमुना दि़ १० ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवला होता़ त्याचा अहवाल प्राप्त झाला असून सदरील बॉटलवर इम्मामोटीन बोनझाईट ५ टक्के असे नमूद करण्यात आले होते.

परंतू प्रत्यक्ष तपासणीत ० टक्के आढळून आल्याचे औरंगाबाद प्रयोगशाळेने रिपोर्टद्वारे सांगितले असल्याची माहिती सुनिल बावळे पाटील यांनी दिली आहे़ त्यामुळे शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे़ त्यामुळे शेतक-यांनी पक्के बिल घेवून शेतमाल खरेदी करावा़ तसेच याबाबत काही अडचणी आल्यास शेतकरी बचाव कृती समिती भक्कमपणे शेतक-यांच्या पाठीशी उभा राहील असे कृती समितीचे संघटक सुनिल बावळे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या