27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीपर्यावरण संरक्षणासाठी व्यक्तीची मानसिकता बदलणे आवश्यक : आजेगावकर

पर्यावरण संरक्षणासाठी व्यक्तीची मानसिकता बदलणे आवश्यक : आजेगावकर

एकमत ऑनलाईन

परभणी : पर्यावरणाचे संरक्षण होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनात उचित बदल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलमित्र इंजि. शंकर आजेगावकर यांनी केले. वनामकृवि तील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात माझी वसुंधरा अभियानांतर्गत साजरा करण्यात आलेल्या पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले इंजि. आजेगावकर यांनी उपरोक्त विचार मांडले.

प्रत्येक देशाच्या भवितव्यासाठी पाणी, ऊर्जा, स्वास्थ्य, कृषी आणि जैवविविधता या पंचसुत्री बाबत प्रत्येकाने सजग राहणे नितांत गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत जलमित्र प्रतिष्ठान परभणीचे संस्थापक, डॉ. राजगोपाल कालानी तथा इतर जलमित्र सदस्य डॉ. रवींद्र मुळे रुस्तुम कदम, उमेश पाचलींग यांचे पर्यावरण संरक्षणासाठी असलेल्या बहुमोल योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सामुदायिक विज्ञान विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या या सप्ताहात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी झाडांना आच्छादन, झाडांच्या पालापाचोळयापासून गांडूळ खत निर्मिती, पर्यावरण संरक्षणाबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी व आम्ही पर्यावरण रक्षक पथनाट्य अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या या सप्ताहास डॉ. धर्मराज गोखले , संचालक शिक्षण व अधिष्ठाता, वनामकृवि, परभणी यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच हा सप्ताह यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी डॉ. विद्यानंद मनवर यांनी विशेष प्रयत्न केले.

महाविद्यालयात कार्यरत असणारे डॉ. शंकर पुरी,डॉ. सुनिता काळे,डॉ. तस्नीम नाहिद खान, डॉ. माधुरी कुलकर्णी तसेच इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या सप्ताहादरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमात रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्मचाऱ्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या