24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीजिंतूर उपोषण कर्त्याची चौथ्या दिवशी प्रकृती खालवली ; ग्रामीण रुग्णालयात दाखल

जिंतूर उपोषण कर्त्याची चौथ्या दिवशी प्रकृती खालवली ; ग्रामीण रुग्णालयात दाखल

एकमत ऑनलाईन

जिंतूर (प्रतिनिधी) : जिंतूर तालुक्यातील नदीपात्रातील सावळी बुद्रुक, वझर सह इतर घाटावरील धक्क्यावर सर्व नियम धाब्यावर बसवून बोट,जेसीबी मशीन द्वारे नदीपात्रातून वाळू उपसा करत असल्याने त्यावर कठोर कारवाई करा,म्हणुन रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद चव्हाण याचे तहसील समोर दि.१८मे पासून आमरण उपोषण सुरु असुन दि. २१ मे रोजी उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालवल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

जिंतूर तालुक्यातील काही वाळू घाटांचे लिलाव झालेले आहे तर काही घाटाचे लिलाव झालेले नाही तरी देखील यापैकी काही नदीपात्रातील वाळू घाटावर बोटीने,जेसीबी मशीनने वाळू उपसा केली जात असल्याचा आरोप शरद चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केला असून हा बेकायदेशीर वाळू उपसा करणा-यांवर कठोर कारवाई महसूल प्रशासनाने करावी म्हणुन दि.१८ मे पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष शरद चव्हाण यांनी सुरु केले आहे.

दि. २१ मे दुपारच्या सुमारास उपोषणकर्ते शरद चव्हाण याची प्रकृती खालवल्याने त्यास जिंतुर ग्रामीण रुग्णालयात प्राथमीक उपचार सुरु असल्याची माहिती मिळत असून परभणी जिल्हयात अनेक वाळू घाटावर प्रशासन स्वत: कारवाई करत आहे मग ज्ािंतुर तालुक्यातील वाळू माफियावर वरदहस्त कोणाचे त्यातच पर्यावरण संतुलन नदीपात्रात बिघाड होऊ नये म्हणुन यंत्राद्वारे व रात्रीबेरात्री वाळू वाहतूक थांबवा म्हणुन तहसील समोर लोकशाही मार्गाने उपोषण सुरु असताना देखील जिल्हा व स्थानिक प्रशासनाने बेकायदेशीर उपसा करणा-या वाळू माफियावर कारवाई का केली नाही म्हणुन नागरिकात उलटसुलट चर्चा होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या