22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeपरभणीनोकरी देणारे कृषी पदवीधर घडावेत : प्राचार्य डॉ. सय्यद ईस्­माईल

नोकरी देणारे कृषी पदवीधर घडावेत : प्राचार्य डॉ. सय्यद ईस्­माईल

एकमत ऑनलाईन

परभणी : कृषिच्­या विद्यार्थ्यांनी पदवीच्­या पहिल्­या तीन वर्षात प्राप्­त केलेल्­या ज्ञानाचा आणि कृषि तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवाच्­या शेतात प्रत्­यक्ष वापर करण्­याच्­या दृष्­टीने प्रसार करावा. कृषी पदवी अभ्­यासक्रमाच्­या सातव्या सत्रात कृषि संलग्­न व्­यवसाय आणि कृषि निगडित कंपन्­याचा अभ्­यास करण्­याची विद्यार्थ्यांना संधी आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्­ये कृषी उद्योजकतेची बीजे रोवली जातील. भविष्­यात केवळ नोकरी शोधणारे नव्­हे तर नोकरी देणारे कृषी पदवीधर घडले पाहिजेत, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सय्यद ईस्­माईल यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्­या कृषि पदवीच्­या सातव्­या सत्रात ग्रामीण जागरूकता कायार्नुभव कार्यक्रम (रावे) आणि कृषी औद्यागिक संलग्­नता उपक्रम रा­बविण्­यात येतो. या उपक्रमात कार्यरत विद्यार्थ्यांना कृषिदुत व कृषिकन्­या असे संबोधले जाते. या कृषिदुत व कृषिकन्­यांसाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्­यात आले होते. कार्यक्रमाच्­या अध्­यक्षस्­थानावरून डॉ. सय्यद बोलत होते. यावेळी रावे समन्­वयक विभाग प्रमुख डॉÞराजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. आर.जी. भाग्­यवंत, विभाग प्रमुख डॉ. संजीव बटेवाड, विभाग प्रमुख डॉ. डिगांबर पेरके, सोयाबीन पैदासकार डॉ. शिवाजी मेहत्रे, ज्­वार पैदासकार डॉ. के. आर.कांबळे, मध्­यवर्ती रोपवाटीका प्रभारी डॉ. संतोष बरकुले, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ. रणजित चव्­हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. सय्यद म्­हणाले, अनेक प्रगतशील शेतकरी नाविन्­यपूर्ण शेती करतात. त्­यांच्­याकडून अनेक बाबी शिकण्­याची संधी कृषिच्­या विद्यार्थ्यांना आहे. शेतीतील शेतकरी बांधवाच्­या समस्­या जवळुन अनुभवयास मिळणार आहे.

प्रास्­ताविक डॉ. राजेश कदम यांनी केले. कार्यक्रमात डॉ. भाग्­यवंत, डॉ. पेरके, डॉ. बटेवाड, डॉ. कांबळे, डॉ. मेहत्रे, डॉ. बरकुले, डॉ. चव्­हाण आदींनी मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात विविध विषयावर डॉ. पी.आर. नेहरकर, इंजि. बी. पी. सावंत, डॉ. विशाल अवसरमल, डॉ. डी. व्ही. बैनवाड, डॉ. महेश दडके, डॉ. आर. व्ही. भालेराव, डॉ. एस. एल. वाईकर, डॉ. वानखेडे आदींनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण कापसे यांनी केले. कार्यक्रम यशस्­वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. जक्­कावाड, डॉ. विक्रम घोळवे, डॉ. अंबिका मोरे, डॉ. स­ुनिता पवार, डॉ. अनंत लाड, डॉ. आय. ए. बी मिर्झा, डॉ. एम. एम. सोनकांबळे, डॉ. एस. व्­ही. चिक्षे, डॉ. जी.एन. गोठे, डॉ. गोदावरी पवार, प्रा. आर.सी. सावंत आदींनी कार्य केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या