जिंतूर : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतंर्गत सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर येथे पार पडलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत संत तुकाराम महाराज विद्यालय जोगवाड्याच्या विद्यार्थ्यांनी १४ वर्षे वयोगटात मुले व मुली प्रथम तसेच १७ वर्षे वयोगटात मुले व मुली प्रथम येण्याची परंपरा कायम राखली आहे. हे संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.
यशस्वी खेळाडूंचे शाळेचे अध्यक्ष लक्ष्मीबाई पवार, सचिव शिवचरण बापू, मुख्याध्यापक एस.एम. चव्हाण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या खेळाडूंना मार्गदर्शक रमेश भराड, एल.बी. बुधवंत यांचे मार्गदर्शन लाभले. मुलांचे तालुका संयोजक डी. एस. चव्हाण, तालुकाध्यक्ष अनुप, प्रा. नारायण शिंदे, आरÞडीÞलहाने यांनी अभिनंदन केले. हॉलीबॉलमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल जोगवाडा परिसरातून खेळाडूचे अभिनंदन होत आहे.