सोनपेठ : आजच्या धकाधकीच्या काळामध्ये पत्रकार हा स्वत:च्या आरोग्याची तमा न बाळगता बातमीसाठी सतत धावपळ करत असतो. अशा वेळी स्वत:च्या आरोग्यातकडे दुर्लक्ष होऊन पत्रकार हा तणावपूर्ण वातावरणात जगत असतो़ त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारिता करत असताना तणावमुक्त राहण्याचे प्रतिपादन तहसीलदार सारंग चव्हाण यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त सोनपेठ मराठी तालुका पत्रकार संघ व ग्रामीण रुग्णालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.३ रोजी पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटक तहसीलदार सारंग चव्हाण तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संदिप बोरकर, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.सिद्धेश्वर हालगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवमल्हार वाघे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब गर्जे हे उपस्थित होते.
आरोग्याची देवता धन्वंतरीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो़ आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पत्रकारांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे़ पत्रकार निरोगी असेल तर तो समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करेल असे प्रतिपादन मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, सपोनी संदीप बोरकर, डॉ.सिद्धेश्वर हालगे, डॉ.सुभाष पवार, डॉ.विष्णू राठोड, डॉ.भारत चव्हाण, डॉ.रणजीत राठोड, शिवमल्हार वाघे, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू यांनी केले.
यावेळी पत्रकार राधेश्याम वर्मा, मंजूर मुल्ला, अमोल दहिवाळ, रवींद्र देशमुख, कृष्णा पिंगळे, अनिल लोलगे, गोविंद नाईक, सुभाष सावंत, सुग्रिव दाढेल, राजेश्वर खेडकर, गजानन चिकणे, भागवत पोपडे, सामाजिक कार्यकर्ते राकेश मेहता, सोमनाथ नागुरे, बळीराम काटे, हरीशचंद्र पांचाळ, डॉ.मृदुला देशमुख, डॉ.संग्राम तळेकर, स्वप्नील राठोड, गोविंद राठोड, नृसिंह पुस्टेवाड, सौरभ चव्हाण, कृष्णा माने महेश मिसाळ, मंदाकिनी हारकाळ, वैशाली गाडे, शकुंतला सातसमुद्रे, मेनका लांडे, ॠतुजा औताडे, सखाराम दातार, मुंजाभाऊ आळसे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रस्ताविक शिवमल्हार वाघे यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धेश्वर गिरी व आभार प्रदर्शन बाबासाहेब गर्जे यांनी केले.