29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडाढाका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत परभणीची ज्योती गवते द्वितीय

ढाका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत परभणीची ज्योती गवते द्वितीय

एकमत ऑनलाईन

परभणी : बांगलादेशाची राजधानी ढाका येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत मुंबईची आरती दत्तात्रय पाटील हिने प्रथम तर परभणीची ज्योती गवते हिने द्वितीय क्रमांक पटकावला असुन जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बंगाबंधू आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत या दोघींनी मंगळवार दि. 11 रोजी रात्री हे यश पटकावले.

परभणीची गवते ही मराठवाडा एक्सप्रेस म्हणून सर्वदूर सुपरिचित आहे. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत तिने तीन वेळा प्रथम क्रमांक पटकावला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मँरेथाँन स्पर्धेत ज्योती गवते हिने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. ढाका येथील मॅरेथॉन स्पर्धेत तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिच्यावर परभणीच्या क्रिडाक्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या