26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeपरभणीझरी येथे किसान मोर्चाचे रास्ता रोको आंदोलन

झरी येथे किसान मोर्चाचे रास्ता रोको आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : शेतक-यांच्या सर्व शेतमालाला हमी भाव जाहीर करा व त्यास कायद्याचे संरक्षण द्यावे़ रद्द केलेले तीन कृषी कायदे मागील दरवाज्याने परत आणू नका़ अग्निवीर योजना रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी रविवार, दि़ ३१ जुलै रोजी झरी येथे संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
केंद्र सरकारच्या विरोधात देशभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे़ याचाच एक भाग म्हणून झरी येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सांगली, कोल्हापूरच्या धर्तीवर २०१९च्या शासन आदेशानुसार परभणी तालुक्यातील शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी़ धरण क्षेत्रातील व सर्व नद्या पात्रातील शेतीचे वेगळे पंचनामे करून तात्काळ मोबदला द्यावा़ ग्रामीण भागातील सक्तीची वीज बील वसुली तात्काळ थांबवून वीज कनेक्शन सुरळीत करावे़ शेतक-यांसह सर्व कष्टक-यांना संपूर्ण औषधोचार मोफत द्या आदी मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज झरी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात स्वराज इंडिया पार्टीचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केशव आरमळ, माणिक कदम, प्रहार जनशक्तीचे रोहिदास बोबडे, डॉग़ोविंद कामटे, नितीन सावंत, सर्जेराव पालवे, विलास पवार, किरण जाधव, रहिमोद्दीन अन्सारी, अच्युत चट्टे, मिरजापूरचे सरपंच पांडुरंग जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलकांन जोरदार घोषणाबाजी करीत रास्तारोको केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ त्यामुळे प्रवाशांना मात्र अडचणींचा सामना करावा लागला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या