परभणी : शहरातील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून नागरीकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या त्रासाला कंटाळलेल्या शहरातील दीव्यांग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवार, दि.१२ तीव्र संताप व्यक्त केला. तसेच गांधिगिरी करीत प्रशासनाचे अभिनंदन केले.
शहरातील खराब रस्त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप त्रास होत असतानाही जिल्ह्यातील सर्व नेते, अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दिव्यांग व सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दिव्यांग नागरीकांना हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत याचा कोणताही विचार या लोकांना नाही याची खंत यंत्रणेला का वाटत नाही असा सवाल व्यक्त करण्यात आला आहे. परिसरातील महिलांनी शासकीय अधिकारी यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. शहरातील अतिशय खराब झालेल्या रस्त्यावर गांधीगिरी करीत जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. या प्रसंगी विश्वनाथ गवारे, सारंग साळवी यांच्यासह वांगी रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते.