23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीगंगाखेड कोरोना विलगीकरण कक्षामध्ये सोयी सुविधाचा अभाव

गंगाखेड कोरोना विलगीकरण कक्षामध्ये सोयी सुविधाचा अभाव

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : शहरातील कस्तुरबागांधी वस्तुगृहात आसलेल्या कोरोना विलगरण कक्षामध्ये सुविधाचा अभाव आसल्याने आरोग्य विभागाने सदरील सुविधा तातडीने सोडवाव्यात अशी मागणी राष्ट्रीय मानवधिकार संघाचे बाळासाहेब जंगले यांनी केली आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून दररोज खूप नागरिक रांगेत उभे राहून स्वत:च्या आजाराची कोरोना टेस्ट केल्यानंतर रॅपिड टेस्ट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विलगीकरण कक्षामध्ये कस्तुरबा गांधी वस्तीगृह नियोजित जागेच्या इमारतीमध्ये नागरिकांना निवासी राहण्यासाठी जावे लागत आहे.

विलीनीकरण कक्षामध्ये वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे ऐनवेळेस आजारी जास्त झाल्यास परभणीला रेफर केले जाते असेच रमाबाई नगरातील पुरुष यांना वेळेवर चाचणी अहवाल न आल्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपोर्ट अहवाल मिळाला नाही म्हणून पाचव्या दिवशी परभणीला कोविड रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे असे त्त्यांच्या नातेवाईक यांचे म्हनने आहे. यामुळे गंगाखेड येथील सर्व विलीनीकरण केंद्राला 24 तास वैद्यकीय अधिकारी देऊन सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली या संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जंगले यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना आॅनलाइन निवेदनात द्वारे केली आहे.

या निवेदनावर परभणी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जंगले, सामाजिक कार्यकर्ते प्रसंजीत मस्के, पत्रकार राजेश वामनराव कांबळे यांच्या स्वाक्ष‍र्या आहेत.कस्तुरबा गांधी वस्तीगृह विलीनीकरण केंद्र सुरू झाल्यापासून संबंधित सेंटर मध्ये २४ तास वाचमन वगळता कुठलेही वैद्यकीय अधिकारी स्वच्छता कमर्चारी दिसून येत नाही दिवसातून एक वेळेस स्वच्छता कमर्चारी यांच्या वेळेनुसार येतात व पुन्हा दुस-या दिवशी येतात दिवसातून एक वेळ सॅनिटायझर सकाळी होते त्यानंतर ते कमर्चारी ही दिवसभर दिसत नाही सर्व प्रसाधन ग्रहांमध्ये सध्या घाणीचे साम्राज्य असून ऐनवेळेस कोणाला जास्तीचा आजार झाल्यास वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे अ‍ँबुलन्स मधून परभणीला रेफर केले जाते .

Read More  सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाची आगेकूच

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या