24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीशेतक-यांना कर्ज न देता मंत्र्यांना लाखोंच्या गाड्या

शेतक-यांना कर्ज न देता मंत्र्यांना लाखोंच्या गाड्या

एकमत ऑनलाईन

परभणी : सध्या देशात व राज्यात कोरोना महामारीने सामान्य नागरिक त्रस्त असून शेतक-यांना पीककर्ज देण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे. नागरिकांच्या हाताला काम मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे परंतू महाआघाडीच्या सरकार मात्र मंत्र्यांना नवीन गाड्या देत असल्याच्या निषेधार्थ भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भीकमांगो आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २८ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकाचा यावेळी निषेध करण्यात आला. एकीकडे शेतक-यांना पीककर्जापासून वंचीत ठेवल्याजाते तसेच शासनाच्या विविध महामंडळाच्या कर्मचा-यांना सक्तीने निवृत्त केले जात आहे.आणि दुसरीकडे मंत्र्यांना आलीशान लाखो किमतीच्या गाड्या खरेदी केल्या जातात या प्रकाराबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला.

वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालयासमोरे भाजपाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भूमरे,राजेश देशमुख, शिवाजी शेळके, आकाश लोहट,राजारामधरणे, विलास जोंधळे, लक्ष्मण वाघ,अरुण चौधरी, कैलास हजारे, मुंजाभाऊ वाघ,विलास वाघ , राजाराम धरणे, आदी सहभागी झाले होते.

Read More  मोंढ्यात धोका वाढत असतांना खरेदी-विक्रीला प्रारंभ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या