24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी

परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी

एकमत ऑनलाईन

परभणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त या पावसाळ्यात परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल यासाठी परभणीच्या जिल्‍हाधिकारी आंचल गोयल यांनी रविवारी तीन तालुक्याची आढावा बैठक घेऊन वृक्ष लागवडीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

रविवार दि 12 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष लागवड आणि फुलपिक लागवड मोहिमेसाठी मानवत, पाथरी आणि सोनपेठ तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक यांच्या नियोजन बैठकीचे आयोजन मानवत येथील रेणुका मंगल कार्यालयात करण्यात आले होते.

यावेळी वृक्ष लागवड नियोजन बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) ओमप्रकाश यादव जिल्हा परिषद, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड, पाथरीच्या तहसीलदार श्रीमती मोरे, उप विभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, मानवत, सोनपेठचे तहसीलदार सारंग चव्हाण, मानवतचे गट विकास अधिकारी स्वप्निल पवार, पाथरीचे गट विकास अधिकारी भाऊसाहेब खरात, सोनपेठचे गट विकास अधिकारी संजय धाबे यांच्यासह आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आढावा बैठकीत उपस्थितांना सूचना देतांना जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या की, सर्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी फळबाग लागवड आणि वृक्षलागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करून प्रयत्न करावेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या