सेलू : परभणी जिल्ह्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. आता पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील परभणी जिल्ह्यासाठी विशेष लक्ष देतात. त्यामुळे शिवसेनेशी कुणी गद्दारी करू नये. गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी दिला.
शिवसेनेने सुरवातीपासून तळागाळातील सामान्य लोकांना मोठे केले आहे. रक्ताचे पाणी करून शिवसेना वाढवली आहे. हिंदू हृदय सम्राट स्व़बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला वाढविले, सत्तेत बसवले. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी शिवसेनेला वेगळा चेहरा दिला. त्यामुळे शिवसेनेच्या नादी कुणी लागू नये. लागल्यास त्यांचे काय हाल होतात हे गद्दारांनी अनुभवले आहे. या पुढेही आपण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सेलू तालुक्याला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवू असा निर्धार मा़आ़लहाने यांनी शिवसेनेच्या पदाधिका-यांशी बोलताना व्यक्त केला.