परभणी (प्रतिनिधी) : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात फार्मासिस्ट हाच दुवा आहे. त्यामुळेच फार्मासिस्टचा दर्जा उंचवावा या दृष्टीने अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब श्ािंदे यांनी परभणीत व्यक्त केले.
‘फार्मा क्षेत्रातील व्यवसायिक आव्हाने आणि संधी’ या विषयाला अनुसरुन जिल्हा केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने शहरातील अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यातील केमिस्ट-फार्मासिस्ट यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटन श्ािंदे यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमएससीडीएचे राज्य उपाध्यक्ष अरुण बरकसे, मराठवाडा झोन अध्यक्ष शेखर गाडे, मराठवाडा झोन सचिव कुशल जैन, मराठवाडा झोन उपाध्यक्ष दीपक कोठारी, दीपक पावडे, रामदेव दाड, अरुण सोमाणी, अनिल हरकळ, धनाजी आनंदे हे व्यासपीठावर विराजमान होते.
यावेळी श्ािंदे यांनी आपल्या भाषणातून, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणून फार्मासिस्ट महत्वपूर्ण भूमिका बजावित आला आहे. परंतु, फार्मासिस्टच्या कार्याचा दर्जा वाढविणे नितांत गरजेचे आहे. त्यासाठी माहिती व प्रशिक्षण अत्यंत महत्वपूर्ण आहे.
ऑनलाईन अपग्रेडेशन, ऑनलाईन व ऑफलाईन ट्रेनिंग आणि सेमिनार, फार्मासिस्ट स्टार्टअप करीता शिबीरांचे आयोजन, सर्व विभागातील उत्तीर्ण फामासिस्टची नोंदणी, विविध क्षेत्रातील फार्मासिस्टांना त्यांच्या कार्यक्षेत्राशी निगडीत ऑनलाईन पाठ्यक्रम, प्रशिक्षणाची उपलब्धता, फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक व इतरांना ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याच्या दृष्टीने ई-लायब्ररी वगैरे गोष्टी गरजेच्या आहेत. महिला फार्मासिस्टकरीता सायंटिफिक कोडींग व ट्रान्स्कीप्शन ऑनलाईन कार्यशाळा, विविध प्रोफेशन संधी उपलब्ध करुन देण्यासह त्यांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न गरजेचे आहेत, असे स्पष्ट करीत कायदा व अधिकार, रोजगार, जॉब प्रमोशन व वेतनवाढ, सोयी-सुविधा या संदर्भातही शिंदे यांनी आपल्या भाषणातून परखडपणे विश्लेषण केले. फार्मासिस्टांच्या उज्ज्वल भविष्याकरीता आपण व आपले सहकारी निश्िचतच प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही दिली.
महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या मेळाव्यात शिंदे यांनी पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी सर्वांनी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री व सचिव सूर्यकांत हाके यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.