Thursday, September 28, 2023

लंपीस्किन आजाराने पुन्हा डोके वर काढले

पूर्णा : शहरासह तालुक्यात लंपीस्कीन आजाराने डोके वर काढल्याचे पहावयास मिळत आहे. या आजारामुळे शेतक-यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी याकडे गांभीर्याले लक्ष देण्याची मागणी शेतक-यातून होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्राण्यांमधील लंपीस्किन हा आजार नियंत्रणात आला होता. परंतू मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लंपी स्किन आजाराने बैल, वासरू आदी जनावरांच्या शरीरावर सूज येत आहे व त्यातून काही दिवसांनी रक्तप्रवाह सुरू होत असून काही जनावरे औषध, पाणी, अन्न घेण्यास त्रास होत आहे.

बांधीत जनावरांमुळे या आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. लंपीस्किन आजाराच्या संकटामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत वरिष्ठ अधिका-यांनी या आजारावर गांभीर्याने लक्ष देऊन तालुकास्तरीय पशुवैद्यकीय अधिका-यांना आदेशित करून योग्य ती औषधोपचार व लसीकरण करून लंपी स्किन आजाराचा होणारा पसार टाळावा अशी मागणी शहरातील नागरिकासह शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या